Sign In New user? Start here.
 bhushan pradhan a chocolate heroमराठी चित्रपटसृष्टीतील अलीकडचा तरुणींचा हॉट क्रश म्हणजे भूषण प्रधान. मालिका, नाटक आणि चित्रपटांतून आपलं टॅलेंट सिद्ध करणाऱ्या भूषणने आपल्या लूक्सने तरुणींना आधीच घायाळ केलंय.
 
 
zagmag

चॉकलेट बॉय ते अॅक्शन हिरो

मराठी चित्रपटसृष्टीतील अलीकडचा तरुणींचा हॉट क्रश म्हणजे भूषण प्रधान. मालिका, नाटक आणि चित्रपटांतून आपलं टॅलेंट सिद्ध करणाऱ्या भूषणने आपल्या लूक्सने तरुणींना आधीच घायाळ केलंय. आता आपल्या आगामी ‘टाइम बरा वाईट’ या चित्रपटाद्वारे तो अॅक्शन हिरो साकारत सर्वच वयोगटातील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. आपल्या आयुष्यातील वेळेचे महत्त्व थोड्या हटके पद्धतीने उलगडणारा ‘टाइम बरा वाईट’ १९ जूनला प्रदर्शित होणार आहे.

हटके कथाविषय असलेल्या मल्टीस्टारर 'टाईम बरा वाईट' या सिनेमात भूषण पहिल्यांदाच रोमँटीक आणि अॅक्शन अशा दोन्ही अवतारात पहायला मिळणार आहे. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांतून पुढे आलेल्या भूषणने साकारलेल्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा काहीतरी वेगळं करायला मिळाल्याचं समाधान त्याने व्यक्त केले आहे. डान्स परफॉर्मन्सपासून दूर राहणाऱ्या भूषणने 'टाईम बरा वाईट' मध्ये ‘तुतिया’ सॉंगवरील साऊथ बीट्सवर धम्माल उडवून दिलीये.

'काळ-वेळ’ कधीच, कुणासाठी थांबत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा 'काळ-वेळ’ कधी चांगला तर कधी वाईट असतो त्यावर आपला कुठलाच उपाय चालत नाही. याच कथाबीजावर बेतलेला 'वी. आर. जी. मोशन प्रस्तुत विजय गुट्टे निर्मित 'टाईम बरा वाईट' हा नवा थ्रिलर अॅक्शनपट येतोय. प्रसिद्ध संकलक राहुल भातणकर या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करताहेत.

बाहुल चौधरी सहनिर्मित या चित्रपटात आनंद इंगळे, ऋषिकेश जोशी, सतीश राजवाडे, निधी ओझा, सिद्धार्थ बोडके, सुनील पेंडुरकर, नुपूर दुधवडकर, राजेश भोसले, प्रणव रावराणे आदी कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 

------------------