Sign In New user? Start here.
Bhushan pradhan Diwali celebrationया वर्षीची दिवाळी माझ्यासाठी खास : सुरूची अडकर
 
 
zagmag

दिव्यांची आरास करायला खूप आवडते : भूषण प्रधान

शब्दांकन- गायत्री तेली

Bhushan pradhan diwali celebration

दिवाळी सणासाठी मी लहाणंपणा पासून एक्सायट असायचो.आणि अत्ता ही असतो. दिवाळीच्या दिवशी घरचं वातावरणं हे चैतन्यमय असतं. दारासमोर काढलेली रांगोळी घराबाहेर लटकणार कंदील आणि पणत्यांच्या प्रकाशात उजळूण निघालेलं घर पाहायला मला फार आवडत . याचबरोबर गॅलरीत लावलेलं खूप सारे दिवे पहायला मला आवडतं. दिवाळीची तयारी म्हंटल की आमच्या घरी आधी स्वच्छते पासून सुरवात होते. आणि हो मी आईला प्रत्येक कामात मदत करतो मग ते साफ सफाई असो किंवा घरं सजवणं असो. मला या गोष्टी करायला फार आवडतात.

दिवाळीतली सर्वात आवडती गोष्ट म्हणजे खरेदी तसं पहायला गेल तर आपण वर्षभर खरेदी करत असतो पण दिवाळीच्या खरेदीची मजा काही औरच आहे. मला दिवाळीत खरेदी करायला खूप आवडत.लहाणपणी हट्ट करून आई वडिलांन कडून हवे ते कपडे घ्यायचो पण आता मोठं झाल्यावर आई बाबा नको नको म्हणतं असताना त्यांच्यासाठी खरेदी करणं मला खूप आवडतं. हा जो बदल होतोयं तो मनाला भावणारा आहे आणि आई बांबाच्या डोळ्यातल समाधान बसं अजून काय हवं.

दिवाळीतील सर्वात आवडती गोष्ट म्हणजे अंभ्यगस्नान. आई सकाळी लवकर उठून उटण लावून अंघोळ घालते .तो दिवस निघून गेला की असं वाटंत की अरे किती लवकर संपला हा दिवस. आजकल दिवाळीचे पदार्थ वर्षभर सगळीकडेच उपलब्ध असतातं.जरी फराळाचे पदार्थ वर्षभर खात असलो तरी आईच्या हातचे दिवाळीचे पदार्थ मला खास आवडतात. त्यातल्या त्यात कानोल्या हा माझा आवडीचा प्रकार. माझी आई त्या एवढ्या सुंदर करते की फक्त मी नाही तर आमच्या घरातले सगळेच त्याच्यावर तुटून पडतात.

भाऊबीजेच्या दिवशी तर आमच्या घरात धमाल असते. खूप मॊठ्या प्रमाणावर भाऊबीचेच सेलीब्रेशन केल जात. मला सख्या चुलत अशा जवळ जवळ १२ बहिणी आहेत. या दिवशी आम्ही सगळे एकत्र भेटतो. आजकल आमंच संगळ्यांच एकत्र येणं नाही जमत. पण आजही माझ्या बहिणी भाऊबिजेच्या दिवशी मला अंघॊळ घालतात. घर बहिणींमुळे आनंदाने भरूण जात. आणि हा एकच दिवस असां असतो की आम्ही सगळे एकत्र भेटतो खूप धमाल करतो .

लहाणपणी बाबा खूप फटाके आणायाचे ज्या प्रकारे प्रॉप्रर्टी वाटली जाते त्याचप्रकारे फटाक्याचे वाटप बाबा करायचे. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं मोठे बॉक्स घेऊनच बांबासमोर बसायचो . मग बांबानी आम्हा दोघांना दिलेले फटाके आम्ही एक्सचेंज करायचो. आता मी फटाके वाजवत नाही कारण त्याचा होणारा आवाज आणि प्रदूषणाबाबत जागृक आहे. गेल्या काही वर्षात आम्ही फटाके लावले नाहीत पण त्यामुळे दिवाळीचा उत्साह कमी झाला नाहीए. दिवाळी दरवर्षी येतं असली तर ती प्रत्येक वर्षी मला हवी हवीशी आणि नवीन वाटते.

------------------