Sign In New user? Start here.
birhtday surprise for sai tahmankar काहीस सई ताम्हणकरच्या फॅन्सच्या बाबतीत झालय़ं. २६ जूनला सईचा वाढदिवस आहे. त्यामुळे दोन दिवस आधीच म्हणजे उद्या २४ तारखेला सईचे फॅन्स तिला पुण्यामधे सरप्राईज देणार आहे
 
 
zagmag

काय आहे 'सई' ताम्हणकरसाठी टीम ड्रीमर्सच 'सरप्राईज'

वाढदिवस म्हटंल की त्या दिवशी काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे होना. मग तो आपल्या आवडत्या व्यक्तीचा असेल तर मग उत्साह काही वेगळाच असतो. असंच काहीस सई ताम्हणकरच्या फॅन्सच्या बाबतीत झालय़ं. २६ जूनला सईचा वाढदिवस आहे. त्यामुळे दोन दिवस आधीच म्हणजे उद्या २४ तारखेला सईचे फॅन्स तिला पुण्यामधे सरप्राईज देणार आहे पण ते नेमक काय असणार आहे ते अजून कळलं नाहिए. समजंल तर सरप्राईज कसं होणार ते ही आहे म्हणा .

संजय जाधव दिग्दर्शित तुहिरे या आगामी चित्रपटातून तसेच बॉलीवूडचा धमाकेदार चित्रपट 'हंटर' नंतर बॉलीवूडमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरचं चर्चेत आली आणि आता सोशल नेटवर्किंगवरील #SurpriseToSaie मुळे पुन्हा चर्चेत आलंय. सोशल नेटवर्किंगवरील #SurpriseToSaie हा ट्रेंड सईला व सईच्या सगळ्यांना चाहत्यांसाठी सरप्राइज बनू लागलाय. प्रत्यक्षात मात्र हे सरप्राईज काय आहे हे कुणालाही नीट सांगता येत नाहीये. आपल्या वेग वेगळ्या चित्रपटातून साकारलेल्या वेगवेगळ्या अदांनी सगळ्यांना सरप्राईज करणा-या सईला आता सईसाठी तिच्या फॅन्सचं काय सरप्राईज आहे, हे टीम ड्रीमर्स आणि तिचे फॅन्स यांच्याशिवाय कोण सांगू शकेल..??

 

------------------