Sign In New user? Start here.
Canadian powla in marathi film "कॅनेडियन पॉला चा मराठी बाणा
 
 
zagmag

कॅनेडियन पॉला चा मराठी बाणा

Canadian powla in marathi film

मराठी भाषा किती गोड असते हे परत एकदा सिद्ध झालं. मुळची कॅनडीयन असलेल्या ‘पॉलामॅकग्लिन’ हीने तसं सिद्ध ही करून दाखवलं आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या “पिंडदान” या मराठी चित्रपटासाठी तिने सिद्धार्थ चांदेकर आणि मनवा नाईक बरोबर एकत्रित काम केलं आहे. मराठीमध्ये परदेशी कलाकारांची एन्ट्री नवी नाही. पण मुळात परदेशी कलाकारांच्या अश्या प्रमुख भूमिकेत काम करण्याने मराठीसृष्टीत एक नवं चैतन्य लाभलं आहे. यासाठी हे परदेशी कलाकारसुद्धा तितकीच मेहनत ही घेताना दिसत आहेत.

हेच बघाना ! पॉला ही मुळची कॅनडीयन असली तरी तिने मराठी भाषा शिकण्यासाठी तितकीच मेहनत देखील घेतली. देवनागरी भाषेतील उच्चार स्पष्ट व्हावे यासाठी तिने गायत्री मंत्राचा जप सुरु केला. फक्त गायत्री मंत्राचा जप न करता त्या मागचा अर्थ ही तिने जाणून घेतला. ‘कोणतीही गोष्ट शिकताना त्या मागील अर्थ मी आधी जाणून घेते मगच ती आत्मसाद करायला मला सोपी जाते’, असं ती म्हणाली. खरतर इतकी मेहनत एका परदेशी कलाकारांकडून फारशी अपेक्षित नसते . कारण इथे बऱ्याच हिंदीतल्या अभिनेत्यांची मराठीत बोलताना बोबडी वळते. तिथे पॉलाची ही मेहनत वाखाण्याजोगी आहे.

पॉलाने या चित्रपटात अॅना नावाच्या ब्रिटीश मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. जी काही कारणानिमित्त महाराष्ट्रात येथे आणि इकडचीच होऊन जाते. तिला हा देश आणि येथील संस्कृती याची उत्सुकता लागलेली असते त्यामुळे भारतात आल्यावर ती सर्व रूढी आणि परंपरा शिकते. ‘अभिनय करता करता मला कधी ही संस्कृती आपलीशी वाटू लागली हे माझ मला देखील कळल नाही’, असं ही ती म्हणाली. सुरुवातीला मी जेव्हा चित्रपटाचे संवाद वाचले तर ते मराठीत होते. ते मी आधी इंग्लिशमध्ये लिहिले आणि मग वाचू लागले.संवाद बोलताना शब्दांचे उच्चार कसे असावेत याबद्दलच मार्गदर्शन मला वेळोवेळी माझ्या दिग्दर्शकांकडून, मित्रांकडून आणि सह-कलाकरांकडून मिळत गेलं. त्यांच्या मदतीमुळेच मी कॅमेरासमोर न डगमगता संवाद बोलू शकले, असं तीने सांगितलं.

swapnil and anjana's chand matala song
------------------------------------------.