Sign In New user? Start here.
"५. हॅरी पॉटर' चे दिग्दर्शकांने केली कोर्ट चित्रपटाच्या दिग्दर्शकाची निवड’
 
 
zagmag

"हॅरी पॉटर' चे दिग्दर्शकांने केली कोर्ट चित्रपटाच्या दिग्दर्शकाची निवड"

chaitanya selected by harry potter director

चैतन्य ताम्हाणेचा ‘कोर्ट’ २०१५ साली प्रदर्शित झाला आणि भारताकडून ‘ऑस्कर’साठी ‘कोर्ट’ ची निवड करण्यात आली. तेव्हापासून एका वेगळ्या विषयावर चैतन्य काम करत होता.नवीन कलाकारांना अनुभवी कलारांचा सहवास व मार्गदर्शन मिळण्यासाठी ‘रोलेक्स मेन्टॉंर अँड प्रोटेजी आर्ट्स इनिशिएटिव्ह’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या अंतर्गत हॉलिवूड फिल्ममेकर अलफॉन्सो क्युरॉन यांच्यासोबत चैतन्य ताम्हाणेला काम करण्याची संधी मिळाली आहे. खुद्द अलफॉन्सो यांनी चैतन्यची निवड केली.

chaitanya selected by harry potter director

ऑस्कर विजेते फिल्ममेकर अलफॉन्सो क्युरॉन यांनी हॅरी पॉटर सोबतच ‘ग्रेट एक्सपेकटेशन्स’, ‘चिलेंड्रन ऑफ मेन’, ‘ग्रॅव्हिटी’ आणि दि प्रिझनर ऑफ अझकाबान’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सैराटच्या निमित्ताने मराठी चित्रपटाचे भारतातूनच नव्हे तर परदेशातही कौतुक होत आहे. आता त्यात या यंग मराठी दिग्दर्शकाची दखल हॉलीवूड कडून दखल घेतली जात आहे ही कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

------------------------------------------.