Sign In New user? Start here.

माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा छोट्या पडद्यावर

  Cricketer Sandip Patil’s son to debut in Marathi TV serial. तुम्हाला वाटंल असेल की मधूनच क्रिकेटपटूच काय? पण लवकरच भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील आता छोट्या पडद्यावर दिसणार आहे.
 
 
zagmag

माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा छोट्या पडद्यावर

मनोरंजन क्षेत्र असं आहे की ते प्रत्येकाला जवळून पहावस ,अनुभवास वाटंत. म्हणूनच या क्षेत्राकडे युवापिढी जास्त आकर्षित होताना दिसत आहे. मग ते सामान्या लोक असोत किंवा बिझनेसमन, क्रिकेटपटूची मुलं . तुम्हाला वाटंल असेल की मधूनच क्रिकेटपटूच काय? पण लवकरच भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील आता छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

स्टारप्रवाह या चॅनेलवरील येक नंबर या मालिकेत चिराग एका रावडी गुंड मुलाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन गिरीश मोहिते करत असून 22 जून रोजी ही मालिका सुरु होत आहे. या मालिकेसाठी आधी ऑडीशन घेण्यात आल्या होत्या आणि अनेक तरूणांमधून चिरागची निवड करण्यात आली . चिराग या मालिकेमधे देवा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.देवा हा शहरातील श्रीमंत उद्योगपती सयाजी भंडारी यांचा जिद्द, महत्वकांक्षी, व्यवहारी आणि बेधडक मुलगा आहे.

 

------------------