Sign In New user? Start here.
dangarkar working as a music director"संगीतकार गौरव डगांवकर"
 
 
zagmag

संगीतकार गौरव डगांवकर

संगीताची आवड असणे आणि त्या आवडीला जिद्दीने आणि मेहनतीने एक योग्य दिशा दाखवून हिंदी सिनेमा श्रुष्टीत स्वतःच नाव बनवणं आणि टिकवणं हे फार ठराविक संगीतकारांनाच जमतं . आणि त्यातील एक मराठी उभरत नाव म्हणजे संगीतकार गौरव डगांवकर . सन २०११ मध्ये त्याचा पहिला हिंदी सिनेमा आला " लंका " ज्याचे दिग्दर्शक होते मकबूल खान आणि निर्माते होते विक्रम भट्ट .त्यातील श्रेया घोषाल च्या आवाजातील गाणं " शीत लहर" हे खूप गाजलं होत , या गाण्याला अवॉर्ड्स सुद्धा मिळाले . , त्याच सिनेमातील केके ने गायलेलं गाणं "बरहम है हम " नावाजलं गेलं आणि या मराठी संगीतकाराच हिंदी चित्रपट सृष्टीत दमदार पदार्पण झालं .त्यांनतर २०१२ मधील " विल यु मॅरी मी " या सिनेमा मधील राहत फते अली खान ने गायलेलं " सोनिये " हे गाणं किंवा त्याच वर्षातील अक्षय कुमार चा " जोकर " या सिनेमातील सुनिधी चौहान ने गायलेलं प्रसिद्ध गाणं " I WANT FAKT YOU " किंवा तिनेच गायलेलं " बावरा मन " यामुळे संगीतकार गौरव डगांवकर याची इंडस्ट्री मध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली .

गौरव भारतात संगीतकार म्ह्णून नाव कमावत होताच पण त्याचवेळी श्रीलंका आणि नेपाळ मध्ये त्याची एक वेगळी ओळख निर्माण होती ती म्हणजे त्या भाषेतील एक उत्तम गायक म्हणून आणि त्याने या क्षेत्रात सुद्धा आपला ठसा उमटवला .

२०१४ मधील शेखर सुमन दिग्दर्शित हार्टलेस या सिनेमातील गाणी सुद्धा लोकांना आवडली . त्यातील अरजित सिंग ने गायलेलं " मैं धुंडने को जमाने मे " हे गाणे कित्येक आठवडे सर्व म्युझिक चॅनेलच्या चार्टबस्टर वर नंबर १ ला होते. युथ ने गाणं अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या वर्षात आणि पुढील वर्षात गौरव चे ४ हिंदी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत . हिंदी प्रमाणे गौरवला मराठी सिनेश्रुष्टीत आता आपले पाय भक्कम रोवायचे आहेत . त्यामुळे हा गुणी मराठी संगीतकार आता मराठी संगीत आपल्यासाठी घेऊन येत आहे . येत्या २३ सप्टेंबर ला त्याचा नवीन मराठी सिनेमा येतोय " वन वे तिकीट " .यात सचित पाटील , नेहा महाजन , शशांक केतकर , गश्मीर महाजनी आणि अमृता खानविलकर अशी मोठी कलाकार मंडळी आहेत .या सिनेमात संगीतकार आणि गायक या दुहेरी भूमिकेत गौरव सर्वांसमोर येणार आहे .

------------------