Sign In New user? Start here.
 Dhinchak Enterprise” Starring Bhushan Pradhan and Manava Naik. मराठी सिनेमात चांगले विषय हाताळले जात आहेत, त्याचप्रमाणे फ्रेश जोड्या ही सिनेमात पाहायला मिळत आहेत. अशीच एक फ्रेश जोडी ढिंच्याक एंटरप्राइज या आगामी सिनेमातून आपल्यासमोर येते आहे.
 
 
zagmag

मनवा आणि भूषण पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर !

मराठी सिनेमात चांगले विषय हाताळले जात आहेत, त्याचप्रमाणे फ्रेश जोड्या ही सिनेमात पाहायला मिळत आहेत. अशीच एक फ्रेश जोडी ढिंच्याक एंटरप्राइज या आगामी सिनेमातून आपल्यासमोर येते आहे. मार्केटिंगचे अनेक नवे फंडे आपल्याला या सिनेमातून मिळणार आहेत.

फक्त प्रोडक्ट विकण्यासाठी मार्केटिंगचा वापर होतो अस नाही, तर त्याव्यक्तिरिक्तही मार्केटिंगचे फंडे आपल्याला अनेक ठिकाणी उपयोगी येऊ शकतात, हे या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. त्यासोबतच मनवा नाईक आणि भूषण प्रधानची लव्ह केमेस्ट्रीही सिनेमात असणार आहे. निशांत सपकाळे यांनी सिनेमाच दिग्दर्शन केल असून चार्मी गाला हे निर्माते आहेत. उदयसिंग मोहिते यांनी छायाचित्रिकरणाची धुरा सांभाळली आहे, तर समीर साप्तीस्कर आणि काशी रिचर्ड यांनी मिळून सिनेमाला संगीत दिल आहे.

सचिन पाठक आणि मयुर सपकाळे यांनी सिनेमाची गीते लिहिली असून हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या गायकांनी या गीतांना आपला आवाज दिला आहे. हिंदीतले प्रख्यात गायक मिका सिंग, हर्षदीप कौर, पापोन, तर मराठी सिनेसृष्टीतला शिंदे शाहीतला आदर्श शिंदे यांनी गाणी गायली आहेत. देवेंद्र मुरुडेश्वर यांनी सिनेमाचे संकलन केले आहे. यावर्षीच्या ३१ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

------------------