Sign In New user? Start here.
famliy katta the 1st movie production of vandana gupteगेली ४४ वर्षे या क्षेत्रात घालविल्यावर आता निर्मितीमध्ये उतरलेल्या वंदनाताईंच्या या पहिल्या चित्रपटाबद्दल त्यांच्या चाहत्यांसोबत त्याही तितक्याच उत्सुक आहेत.
 
 
zagmag

फॅमिली कट्टा’ वंदना गुप्ते यांची पहिली चित्रपट निर्मिती

गेली चार दशके मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा अवीट असा ठसा उमटवणाऱ्या वंदना गुप्ते यांची निर्मिती असलेला ‘फॅमिली कट्टा’ मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. गेली ४४ वर्षे या क्षेत्रात घालविल्यावर आता निर्मितीमध्ये उतरलेल्या वंदनाताईंच्या या पहिल्या चित्रपटाबद्दल त्यांच्या चाहत्यांसोबत त्याही तितक्याच उत्सुक आहेत.त्यांनी १९७१ साली ‘पद्मश्री धुंडिराज’ या नाटकाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४ दशके त्यांनी मराठी रंगभूमीवर अनेक नाटके गाजविली आहेत. गगनभेदी, रमले मी, रंग उमलत्या मनाचे, अखेरचा सवाल, वाडा चिरेबंदी, श्री तशी सौ, अभिनेत्री, शु कुठे बोलायचे नाही, सातव्या मुलीची सातवी मुलगी, झुंज, प्रेमाच्या गाव जावे, संध्याछाया, मन उधान वाऱ्याचे, सुंदर मी होणार, चारचौघी अशा अनेक वैविध्यपूर्ण नाटकांमधून त्यांनी अविस्मरणीय भूमीका करून रसिकांना मंत्रमुग्ध केले

त्याव्यतिरिक्त निवडक मालिका व मराठी चित्रपटही त्यांनी केले. लपंडाव, पसंत आहे मुलगी, नॉट ओन्ली मिसेस राउत, भेट, मणी मंगळसूत्र, बे दुणे साडेचार, आंधळी कोशिंबीर वगैरे चित्रपटातील भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. ‘पछाडलेल्या’मधील दुर्गा मावशी या भूमिकेला तर महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट विनोदी भूमिकेचा पुरस्कार मिळाला. ‘मातीच्या चुली’मधील सासूच्या भूमिकेसाठी त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला.समांतर, आई, एक चिरंजीव ज्योत, अभिलाषा, आंबट गोड इत्यादी निवडक मालिका त्यांनी केल्या. ‘या गोजिरवाण्या घरात’मधील कांचन नेनेची भूमिका अजूनही लोकांचा स्मरणात आहे. भूमिकेच्या निवडीबाबत अतिशय चोखंदळ असलेल्या वंदना गुप्तेनी स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग निर्माण केला असून सतत काहीतरी वेगळे आणि चांगले देण्याकडे त्यांचा कल असतो.

‘सिस्टर कन्सर्न एन्टरटेन्मेंट’ या कंपनीमध्ये त्यांची धाकटी बहिण राणी वर्मा ही भागीदार आहे. राणी वर्मा या सुपरिचित गायिका आहेत. वयाच्या ७व्या वर्षापासून प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांच्या ‘गीत गोपाळ’ या कार्यक्रमातून प्रथम रंगमंचावर पदार्पण केल्यानंतर त्यांनी अनेक नामवंत गायकांसोबत गाण्याचे कार्यक्रम सादर केले.महाराष्ट्रच्या लाडक्या गायिका माणिक वर्मा आणि प्रभात कंपनीपासून चित्रपट क्षेत्रात असलले गीतकार, संवादलेखक, शायर श्री अमर वर्मा यांच्या या दोन कन्या आज अभिमानाने व आत्मविश्वासाने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाउल टाकत आहेत. कलाक्षेत्राशी काही दशकांचा संबंध असलेल्या या दोघींचा ‘फॅमिली कट्टा’ म्हणूनच उत्कृष्ट असेल आणि प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही.

/p>

 

------------------