Sign In New user? Start here.
'friendship day celebration on marathi film classmate set चित्रपटाच्या सेटवर शुटिंग दरम्यान, कलाकारांमध्ये एकप्रकारचे बॉंडींग निर्माण होत आणि यातूनच नविन नाती निर्माण होतात ती म्हणजे मैत्रीची. अशाच क्लासमेट चित्रपटाच्या सेटवर. चित्रपट शुट करता करता सर्व कलाकारांमध्ये क्लासमेट सारख बॉंडींग झाल आहे.
 
 
zagmag

“क्लासमेटच्या” सेटवर फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन

चित्रपटाच्या सेटवर शुटिंग दरम्यान, कलाकारांमध्ये एकप्रकारचे बॉंडींग निर्माण होत आणि यातूनच नविन नाती निर्माण होतात ती म्हणजे मैत्रीची. अशाच क्लासमेट चित्रपटाच्या सेटवर. चित्रपट शुट करता करता सर्व कलाकारांमध्ये क्लासमेट सारख बॉंडींग झाल आहे. म्हणूनच रविवार या क्लासमेट च्या सेटवर चित्रपटातील सर्व क्लासमेटनी फ्रेंडशीप डे साजरा केला. या सेलिब्रेशन मध्ये सर्व कलाकारांनी उत्साहात सहभाग घेतला या मध्ये सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी आणि क्लासमेटची संपूर्ण टिम यामध्ये सहभागी झाली होती.

एस. के. प्रोडक्शनचे संदीप केवलानी व्हिडियो पॅलेसचे नानूभाई म्हाळसा एन्टरटेनमेंटचे सुरेश पै यांची निर्मिती असलेल्या 'क्लासमेट' या चित्रपटात प्रेम, मैत्री, जोश, थरार, संगीत असा संगम पाहायला मिळणार आहे. तरुणाईचा चित्रपट असला तरी तो वेगळ्या धाटणीचा असणार आहे.बेला शेंडे यांनी या चित्रपटातील गाणं गायलं आहे. या भावस्पर्शी गाण्याचे बोल सिद्धहस्त गीतकार गुरु ठाकूर यांचे असून युवा संगीतकार अमित राज याचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. 'याद तुझी साद तुझी दरवळती श्वास तुझे जरा येऊनी या मनाला सावर रे ' असे बोल असलेल्या या गाण्यातून प्रेम भावना व्यक्त झाली आहे. मराठीतले तीन आघाडीचे संगीतकार या चित्रपटाला लाभले आहेत.

१९९४ चा कालावधी या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे चित्रपटाच संगीत, वेशभूषा या सगळ्या बाबतीत एक वेगळेपण चित्रपटातून पहायला मिळणार आहे. आजचे आघाडीचे तरुण कलाकार या यूथफुल सिनेमातून ३१ ऑक्टोबरला आपल्या भेटीला येणार आहेत.

------------------