Sign In New user? Start here.
Hindi celebrities tweeting about 'Rege'सचिन पिळगावकर या सदाबहार सुपरस्टार आपण गोड चेह-याचा कलाकार म्हणूनच गेली पाच दशके ऒळखतो. त्यांच्य चेह-यावर कधी कुणी दाढीची खुंदे पाहिली आहेत? नाही ना! अगदी त्यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकरांनीही आतापर्यंत पाहिली नव्हती.
 
 
zagmag

“ दीपिका पडुकोण, शेखर रावजियानी, रितेश देशमुखने केले ‘रेगे’चे प्रमोशनल साँग ट्वीट"

रवी जाधव प्रस्तुत आणि अभिजित पानसे लिखित-दिग्दर्शित ‘रेगे’ची जबरदस्त हवा निर्माण झाली असून हिंदीतल्या आघाडीच्या सेलेब्रिटीजही ‘रेगे’विषयी ट्विटरवर ट्विट करत आहेत. ‘रेगे’चे ‘ढिचक्यांव’ हे नवे प्रमोशनल साँग नुकतेच यूट्यूबवर रिलिज करण्यात आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच दीपिका पडुकोण आणि रितेश देशुमखसारख्या सेलेब्रिटीजने ट्विटवरील आपल्या हँडलवर या गाण्याचा व्हिडिओ पोस्ट करून ‘रेगे’च्या टीमला शुभेच्छा दिल्या.

चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावू लागली आहे. एखाद्या चित्रपटाविषयी त्या चित्रपटात नसलेल्या अन्य सेलेब्रिटीज सोशल मीडियावर काय बोलतात, हा त्या चित्रपटाच्या लोकप्रियतेचा मापदंड ठरू लागला आहे. मात्र, मराठी चित्रपट या माध्यमाचा फारसा प्रभावी वापर करताना दिसत नाहीत. ‘रेगे’ने मात्र फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरचा प्रभावी वापर सुरू केला असून हिंदी सेलेब्रिटींचं लक्षही ‘रेगे’ने वेधून घेतल्याचं दिसून येत आहे.

दीपिका पडुकोणसारखी आघाडीची अभिनेत्री, विशाल-शेखर या आघाडीच्या संगीतकार जोडीतील शेखर, रितेश ‘लय भारी’ देशमुख यांनी ‘रेगे’चं प्रमोशनल साँग आपल्या हँडलवरून रीट्विट करून हिंदी चित्रपटसृष्टीही ‘रेगे’ची दखल घेत असल्याचं दाखवून दिलं आहे.

महेश मांजरेकर, संतोष जुवेकर, पुष्कर श्रोत्री, आरोह वेलणकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं छायालेखन महेश लिमये याने केलं आहे. अभिजित पानसे लिखित गीतांना अवधूत गुप्तेचं संगीत लाभलं असून ‘ढिचक्यांव’ गाण्याने धुमाकूळ घातला आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ जाधव, संजय जाधव, सई ताम्हणकर, आदिनाथ कोठारे, प्रिया बापट, उर्मिला कानेटकर आदी आघाडीच्या कलावंतांनी सहभाग घेतला आहे. रवी जाधव प्रस्तुत आणि अभिजित पानसे व ‘एआरडी एंटरटेनमेंट’ निर्मित ‘रेगे’ने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, पटकथा आणि संकलनाच्या झी गौरव पुरस्कारांवर नाव कोरले असून आता तो १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात प्रदर्शित होत आहे.

 

------------------