Sign In New user? Start here.
hrishita bhatt now in marathi films ह्रषिता भट्ट...‘अशोका’, ‘शरारत’, ’दिल विल प्यार व्यार’, ’हासिल’, ‘पेज3’ सारख्या चित्रपटांतून हिंदी सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण करणारी ह्रषिता ब्रम्हांडनायक मूवीज् प्रस्तुत ‘ढोल ताशे’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहे..
 
 
zagmag

ह्रषिताचं मराठीत पुनरागमन

हिंदी सिनेसृष्टीत बरेच मराठी चेहरे आपण बघतो. अगदी तसेचं मराठीकडेही हिंदी कलाकारांचा कल आपल्याला दिसून येतो. पूर्वीपासून ही देवाण-घेवाण कायम आहे. मग अरूणा इराणी सारखी अभिनेत्री असेल किंवा जॉनी लिव्हर सारखा अभिनेता किंवा हल्लीच्या चित्रपटात झळकलेला भाईजान सलमान खान...मराठीची जादू हिंदी कलाकारांवर कायम आहे. असाचं एक चेहरा ज्याने दोन वर्षांपूर्वी मराठीत पदार्पण केलं. ही अभिनेत्री म्हणजे ह्रषिता भट्ट...‘अशोका’, ‘शरारत’, ’दिल विल प्यार व्यार’, ’हासिल’, ‘पेज3’ सारख्या चित्रपटांतून हिंदी सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण करणारी ह्रषिता ब्रम्हांडनायक मूवीज् प्रस्तुत ‘ढोल ताशे’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहे....

ह्रषिताने मनी-मंगळसूत्र या चित्रपटातून मराठीत पदार्पण केलं. या चित्रपटात तिचं काम चांगलचं गाजलं होतं. मात्र त्यानंतर ह्रषिता मराठीत दिसली नाही. आता ‘ढोल ताशे’च्या निमित्ताने ह्रषिता पुन्हा एकदा मराठी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात ह्रषिता अभिजीत खांडकेकरच्या प्रेयसीची भूमिका साकारत आहे. यानिमित्ताने मराठी सिनेइंडस्ट्रीत अजून एका रोमँटिक जोडीची भर पडणार आहे. आता या जोडीला प्रेक्षक किती पसंत करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं.

ह्रषिता भट्ट आणि अभिजीत खांडकेकर यांच्यासह जितेंद्र जोशी, प्रदीप वेलणकर, इला भाटे, विनय आपटे आणि इतर कलावंत ही या चित्रपटात आहेत. राजकुमार अंजुटे आणि अतुल तापकिर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची गीते गुरू ठाकूर यांनी लिहीली असून निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केली आहेत. चित्रपटाचं छायाचित्रदिग्दर्शन केदार प्रभाकर गायकवाड यांनी केले आहे. येत्या ३ जुलै ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

------------------