Sign In New user? Start here.
prathana now in hindi films "ह्रतिक रोशनच्या विरूध्द नकरात्मक भूमिकेत गिरीश कुलकर्णी
 
 
zagmag

ह्रतिक रोशनच्या विरूध्द नकरात्मक भूमिकेत गिरीश कुलकर्णी

hrithik roshan & girish kulkarini

पुणे ५२ , देऊळ अशा अनेक चित्रपटांमधून दिसणारा अभिनेता म्हणजेच गिरीश कुलकर्णी. मराठी चित्रपटात आपली ऒळख निर्माण केल्यानंतर आता गिरीश हिंदी चित्रपटामध्ये झळकणार आहे. अभिनेता ह्रतिक रोशन सोबत गिरीश बॉलीवूडच्या मोठ्या पडद्यावर लवकरच दिसेल. राकेश रोशन यांच्या काबील चित्रपटात गिरीश दिसणार असून हा त्याचा दुसरा चित्रपट आहे. या आधी अनुराग कश्यप यांच्या अगली या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. राकेश रोशन यांच्या फिल्मक्राफ्ट या बॅनरखाली काबील हा चित्रपट बनत आहे ज्याचं दिग्दर्शन संजय गुप्ता करत असून चित्रपटाच्या चित्रिकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे.

काबील चित्रपटात गिरीश कुलकर्णी यांची निगेटिव्ह भूमिका आहे. ह्रतिक रोशन च्या विरूध्द निगेटीव्ह भूमिकेत गिरीश कुलकर्णी यांची व्यक्तीरेखा बघण्यासारखीच असेल अशी तुर्तास तरी आशा करण्यास हरकत नाही. या चित्रपटात ह्रतिक रोशन आणि यामी गौतम प्रमुख भूमिकेत आहेत.

------------------------------------------.