Sign In New user? Start here.
jacky shrof performing kavali"गजानन महाराजांच्या माहात्म्यावर आधारलेल्या या चित्रपटातील एका कव्वालीचे चित्रीकरण नुकतेच पार पडले. यात प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी एका कव्वालीवर ठेका धरला. ‘तू ही ताज तू ही साई’ असे बोल असलेल्या कव्वालीवर जॅकी श्रॉफ तल्लीन होऊन नाचले. या कव्वालीचं नृत्यदिग्दर्शन भूपी दास यांनी केलं आहे.
 
 
zagmag

जॅकी श्रॉफ यांनी धरला कव्वालीवर ठेका

गजानन महाराजांच्या माहात्म्यावर आधारलेल्या या चित्रपटातील एका कव्वालीचे चित्रीकरण नुकतेच पार पडले. यात प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी एका कव्वालीवर ठेका धरला. ‘तू ही ताज तू ही साई’ असे बोल असलेल्या कव्वालीवर जॅकी श्रॉफ तल्लीन होऊन नाचले. या कव्वालीचं नृत्यदिग्दर्शन भूपी दास यांनी केलं आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते अनुप गोरे आहेत. बऱ्याच कालावधीनंतर मराठी चित्रपटात चक्क एका कव्वालीवर परफॉर्म करायला मिळाल्याचा आनंद यावेळी जॅकी श्रॉफ यांनी व्यक्त केला.

प्रवीण दवणे यांनी लिहिलेल्या या कव्वालीला संगीतकार नंदू होनप यांचं सुमधुर संगीत लाभलं आहे.गजानन महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारलेल्या या चित्रपटातून जीवनाचा सकारात्मक पैलू समाजासमोर आणण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. निर्माते दीपक गोरे व दिग्दर्शक पितांबर काळे ‘शेगावीचा योगी गजानन’ हा भक्तीमय चित्रपट घेऊन येत आहेत.

जॅकी श्रॉफ, मिलिंद गुणाजी, संजय खापरे, भारत गणेशपुरे, दिपाली सय्यद, प्रेमा किरण, पूनम विणेकर यांच्या लक्षवेधी भूमिका या चित्रपटात आहेत.

 

------------------