Sign In New user? Start here.
janiva film trailer launch कताच महेश मांजरेकराचा मुलगा सत्या लीड रोल करत असलेला मराठी चित्रपट जाणिवाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने पण हजेरी लावली.
 
 
zagmag

बजरंगी भाईजानसाठी सत्याने बदली जाणिवा्ची रिलीज डॆट

नुकताच महेश मांजरेकराचा मुलगा सत्या लीड रोल करत असलेला मराठी चित्रपट जाणिवाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने पण हजेरी लावली. सलमान जिथे जातो तिथल वातावारण हे बदलून जातं त्याच्या मिश्कील स्वभावामुळे तो दुस-यांनापण आपुला वाटतो. परत एकदा त्याच्या या स्वभावाची प्रचिती जाणिवा चित्रपटाच्य ट्रेलर लॉन्चला आली. सलमान खानने सत्याला जीम मधे वर्कआउट करण्याच आमंत्रण दिल.

सलमान खान जीम मधाल किस्सा सांगताना म्हणतो की सत्या माझ्या जीममध्ये येतो आणि वर्कआउट करण्याआधीच म्हणतो सर,आज मी खूप दमलोय. सलमानचा आणि सत्याचा चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार होता. याबद्दल सलमान बोलतो सत्या मला भेटायला आला आणि म्हणाला सर, मी एक सिनेमा केला आहे. आणि हा सिनेमा तुमच्या ‘बजरंगी भाईजान’सोबतच १७ जुलैला रिलिज होणार आहे. मी त्याला म्हणालो की, सत्या प्लिज तुझ्या सिनेमाची रिलिज डेट पुढे ढकल, कारण मला ‘बजरंगी भाईजान’ची चिंता आहे.असं तो मिश्कीलपणे म्हणाला या प्रकारे सलमानने सत्याची खेचायलाही कमी केली नाही पण त्याच्या या बोलण्यामुळे तो जवळच्या लोंकाची किती काळजी घेतो हे मात्र दिसून आले.

 

------------------