Sign In New user? Start here.
 Ranveer's Marathi sisters. Sukhada, Ranveer and Anuja जितेंद्र तयार झाला आहे तो "प्रेमासाठी कमिंग सून" ह्या सिनेमातल्या राऊडी डायलॉगबाजीसाठी...
 
 
zagmag

"जितेंद्र जोशी"चा राउडी लूक

चित्रपटातील व्हिलन्स आजही फेमस आहेत ते त्यांच्या डायलॉग्समुळे, त्यांच्या खलनायकी अभिनयामुळे... बॉलीवुडमध्ये ही परंपरा ब-याच वर्षापासून रूळताना दिसते आहे... बॉलीवुड असो की आपली चंदेरी दुनिया या दोन्ही सृष्टीतही सिनेमात व्हिलेन सोबतच त्याच्या संवादावर भर दिला जातोय हे मात्र नक्की... मराठी इंडस्ट्रीत गुणी कलाकारांच्याबाबतीत मागे नाही.... सिनेसृष्टीत असे ही ताकदीचे कलाकार आहेत.

ज्यांनी आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे... असाचं एक गुणी कलाकार म्हणजे जितेंद्र जोशी...दुनियादारीतल्या आपल्या डायलॉग्सने धूमाकूळ घातल्यानंतर जितेंद्र तयार झाला आहे तो "प्रेमासाठी कमिंग सून" ह्या सिनेमातल्या राऊडी डायलॉगबाजीसाठी.... आपल्या अभिनयाची कारकीर्द जितूने सुरू केली ती रंगभूमीपासून....जितूच्या अभिनयाच्य़ा विविध छटा आपल्याला अनेक सिनेमांमध्ये पाहायला मिळाल्या गेल्या वर्षी रिलीज झालेल्या दुनियादारी ह्या सिनेमात जितूने व्हिलेन साकारला...जितूचा हा व्हिलेन प्रेक्षकांनी तर उचलूनचं धरला...साधा सरळ स्वभावाच्या जितूने साकारलेल्या व्हिलन अप्रतमिचं असाचं राऊडी लूक जितू प्रेक्षकांसमोर घेउन येतोयं...

अंकुश काकटकर दिग्दर्शित "प्रेमासाठी कमिंग सुन" ह्या सिनेमात ’जो पळाला तो देवाला मिळाला,’ लाल भडक माल कडक’, ’कामा ना धामाची मला म्हणा मामाची" अशा काही संवादासोबत जितेंद्र काय धमाल आणतो हे आपल्याला सिनेमा पहायला मिळनार आहे.

 

------------------