Sign In New user? Start here.
John Abraham On The Sets Of Chala Hawa Yeu Dya Part चला हवा येऊ द्या" च्या सेटवर जॉनने केली धमाल
 
 
zagmag

"चला हवा येऊ द्या" च्या सेटवर जॉनने केली धमाल.

John Abraham On The Sets Of Chala Hawa Yeu Dya Part

झी मराठी वरील कार्यक्रम "चला हवा येऊ द्या" ची क्रेझ चांगलीच वाढली आहे. फक्त मराठी चित्रपटच नाही तर हिंदी चित्रपटही आपल्या चित्रपटाच प्रमोशन या कार्यक्रमात करण्यासाठी धडपडत असतात. नुकतीच सोनम कपूर आपल्या नीरजा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी "चला हवा येऊ द्या" मध्ये येऊन गेली. नीरजा नंतर आता बॉलिवूड अबिनेता जॉन अब्राहमही आपली फिल्म रॉकी हँडसमच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमाच्या मंचावर आला होता.

यावेळी चला हवा येऊ द्या च्या कलाकारांनी धूम २ च स्किट सादर केलं. या स्किटमध्ये भाऊ कदमने जॉनसाकारला आणि सर्वांना पोट धरून हसवलं, यावेळी जॉन अब्राहमने आपल्या सिनेमातीला गाण्यावर डान्स देखील केला. त्याचबरोबर जॉनने रितेश देशमुख यांच्या लई भारी चित्रपटातील ' आपला हात भारी, आपली लाथ भारी, च्या मायला आपलं सर्वचं लई भारी हा डायलॉग म्हटला..आणि डॉ निलेश साबळे ने विनंती करतातच तंटा नाही तर घंटा नाही, हा डायलॉग खास आपल्या शैलीमध्ये म्हटला...

चला हवा येऊ द्या च्या या भागात भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, सागर कारंडे आणि श्रेया बुगडे तसेच विनित भोंडे यांनी धमाल केली. लवकरच या भाग झी मराठीवर सोमवार आणि मंगळवारी प्रक्षेपीत होईल.