Sign In New user? Start here.
kailas-waghmare's-new-film-manatlya-unhat सध्या मराठी अनेक नवीन चेह-यांनी सिनेसृष्टीत प्रवेश घेतला आहे. अनेक तरूण दिग्दर्शकही चांगले विषय घेऊन आपलं दिग्दर्शकीय पर्दापण जोशात करीत आहेत. त्यातलचं एक नाव म्हणजे सुश्रृत भागवत यांचं... पी.जी या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पर्दापण करीत आहेत..
 
 
zagmag

"जिद्द आणि प्रयत्नांच्या जोरावर कैलास वाघमारे बनला अभिनेता!!

अभिनेता बनण्याचे स्वप्न हे प्रत्येकाचेच असते. परंतु मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जर अधिक मेहनत घेतली तर आपल्याला यशापासून नक्कीच कोणी लांब ठेवू शकत नाही याचा खराखुरा प्रत्यय आला आहे तो अभिनेता कैलास वाघमारेला.जालना जिल्ह्यातील चांदई या छोट्याश्या गावात जन्माला आलेल्या कैलासने कॉलेजमध्ये असताना अनेक पथनाट्य, एकांकिका, लोकनाट्य यामध्ये सहभाग घेऊन अभिनेता बनण्याचे स्वप्न हे उराशी बाळगले होते. एम. ए मराठी पर्यंतचे शिक्षण घेऊन मुंबई येथे नाट्यशास्त्राचे दोन वर्षाचे शिक्षण हे त्याने श्री. वामन केंद्रे यांच्याकडून घेतले.

शिक्षण पूर्ण झाल्यावर काही लहान-लहान नाटकातून भूमिका साकारण्यास त्याने सुरुवात केली. याच दरम्यान सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर यांच्याशी त्याची भेट झाली आणि सह्याद्री वाहिनीवर त्यावेळी सुरु असलेल्या "माझी शाळा" या मालिकेत त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर संदेश भंडारे यांच्या "महादू" या चित्रपटात त्याने एक छोटीशी भूमिका साकारली होती. संभाजी भगत यांच्या "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला" या नाटकामुळे कैलासला खऱ्या अर्थाने एक वेगळी ओळख मिळाली.

आनंद सागर प्रॉडक्शनच्या विजयश्री पाटील यांची निर्मिती असलेला, पांडुरंग जाधव यांचे दिग्दर्शन असलेल्या आगामी "मनातल्या उन्हात" या सिनेमात कैलास अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे. मराठी सिनेसृष्टीत आज एवेढे मोठ-मोठे अभिनेते असताना या सिनेमासाठी दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि संधी दिली त्यासाठी मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. त्यांनी मला या चित्रपटातील अभिनयासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य दिले होते. या चित्रपटातील माझी भूमिका ही अत्यंत आव्हानात्मक असून वय वर्ष २० ते ६५ वर्षापर्यंतची व्यक्तिरेखा मी या चित्रपटात साकारली आहे. चित्रपटाची पटकथा विद्यासागर अध्यापक, पांडुरंग के. जाधव यांनी एकत्रितपणे लिहिली आहे असून संवाद विद्यासागर अध्यापक यांचे आहेत. या चित्रपटात अभिनेते किशोर कदम, समीर धर्माधिकारी, नागेश भोसले, रुचिता जाधव, छाया कदम, मिताली जगताप बालकलाकार हंसराज जगताप, मंथन पाटील आणि ओवेशिक्षा पाटील यांच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहता येणार आहेत.विश्वराज जोशी यांनी लिहिलेल्या गाण्याला राहुल मिश्रा यांचे सुमधुर संगीत लाभले असून चित्रपटातील गाणी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि गायिका रंजना जाधव- माने यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत तर पार्श्वसंगीत अश्विन श्रीनिवासन यांचे लाभले आहे.नागराज दिवाकर यांनी या चित्रपटाचे उत्तम छायांकन केले असून निलेश नवनाथ गावंड यांनी या चित्रपटाचे संकलन केले आहे.

 

 

------------------