Sign In New user? Start here.
ketaki mategaonkar new movie सुजयच्या या सिनेमात पुन्हा एकदा केतकी माटेगावकर मुख्य भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे.
 
 
zagmag

शाळा सिनेमा नंतर आता सुजय डहाकेच्या 'फुंतरु' सिनेमात केतकीची मुख्य भूमिका!!

शाळा सिनेमा मराठी सिनेसृष्टीला बराच काही देणारा ठरला, आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी सिनेमाचा अध्याय लिहिताना या सिनेमाच्या निमित्ताने सुजय डहाके नावाचा दूर दृष्टी असलेला दिग्दर्शक तर सिनेसृष्टीला दिलाच त्याचप्रमाणे केतकी माटेगावकर सारखी सुंदर आणि चाणाक्ष अभिनेत्रीही दिली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातील लोकांना या सिनेमान आपलंस केल. 'शाळा', 'आजोबा' या दोन सिनेमांच्या यशानंतर सुजय डहाकेचा 'फुंतरु' हा नवा सिनेमाच्या शुटींग मध्ये सध्या व्यस्त आहे. सुजयच्या या सिनेमात पुन्हा एकदा केतकी माटेगावकर मुख्य भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे.

व्ही. के. फिल्म्स च्या वंदना ठाकूर आणि अजय ठाकूर यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून 'फुंतरु' हा त्यांचा दुसरा मराठी सिनेमा आहे. ह्या आधी त्यांनी एका धडाकेबाज जिद्दी मुलीची कथा असलेल्या तानी सिनेमाची निर्मिती केली होती 'फुंतरु' सिनेमाची कथा आजवर तयार झालेल्या सिनेमांपेक्षा खूप वेगळी आहे. ह्या सिनेमाच्या निमित्ताने मराठीत सायन्स फिक्शन लव्ह स्टोरी या सिनेमात आपल्या पाहायला मिळणार आहे. 'तानी' सिनेमाच्या यशानंतर रसिक प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा लक्षात घेता या सिनेमाची कथा अगदी योग्य असल्याचे जाणविले आणि त्यातूनच आम्ही या 'फुंतरु' सिनेमाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याचे निर्मात्या वंदना ठाकूर आणि अजय ठाकूर यांनी सांगितले.

सायन्स फिक्शन लव्ह स्टोरी हा प्रकार मराठी सिनेमासाठी तसा नवीन विषय आहे त्यामुळे त्याविषयी सांगण्यापेक्षा तुम्हाला पाहताना नक्की आवडेल असे दिग्दर्शक सुजय डहाकेने सांगितले. मराठीत बहुधा अशा प्रकारचा विषय आजवर हाताळला गेला नसून सर्वप्रथम ही संधी आपल्याला लाभल्याचा सार्थ अभिमान असून तेवढीच जवाबदारी ही वाढल्याचे ध्यानात असल्याचे सुजयने नमूद केले. 'शाळा, 'आरोही, काक्स्पर्श, तानी, टाईमपास' ह्या वेगळ्या सिनेमातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्यानंतर ह्या सिनेमातही एका वेगळ्या भूमिकेतून मी आपल्या भेटीस येणार असून सिनेमाविषयी आता काही सांगण उचित ठरणार नाही, परंतु नक्कीच काहीतरी थ्रिलर अनुभवायला मला मिळणार असल्याचे केतकी माटेगावकरने नमूद केले.

 

------------------