Sign In New user? Start here.
 ketaki solo album published केतकीचा नुकताच "केतकी" हा पहिला सोलो अल्बम प्रकाशित झाला. युनिव्हर्सल म्युझिक इंडिया ने या अल्बमची निर्मिती केली असून व्हिले पार्ले येथील नवीन भाई ठक्कर सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
 
 
zagmag

केतकीचा पहिला सोलो अल्बम प्रकाशित

केतकी माटेगावकर हे नाव आपल्याला अनोळखी नाही. अभिनय, गायन या दोन्ही क्षेत्रात तिन्हे आपली ऒळख निर्माण केली आहे. केतकीचा नुकताच "केतकी" हा पहिला सोलो अल्बम प्रकाशित झाला. युनिव्हर्सल म्युझिक इंडिया ने या अल्बमची निर्मिती केली असून व्हिले पार्ले येथील नवीन भाई ठक्कर सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या अल्बमचे प्रकाशन गायक-संगीतकार शंकर महादेवन, जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते करण्यात आलं.

या कार्यक्रमास प्रथमेश परब, गायिका सुवर्णा आणि पराग माटेगावकर, ऋषीकेश रानडे, संगीतकार मिलिंद जोशी, प्रविण कुवर, मेघना जाधव, अभिनेत्री पूर्वा पवार, गीतकार नचिकेत जोग, केदार परांजपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या अल्बममध्ये एकूण नऊ गाणे आहेत. 'माझ्या मना...', 'भास हा...', 'चंद्र माझ्या ओंजळीत...', 'काळ लोटला...', 'मनमोहना...', 'नादावल पाखरु...', 'पुन्हा एकदा...', 'पाऊस होऊन ये...' या गीतांचा सामावेश आहे. गीतकार नचिकेत जोग, श्रुती विश्वकर्मा आणि वैभव जोशी यांची लिहिलेल्या या गाण्यांना संगीतकार केदार पंडित यांनी संगीत दिले आहे.

 

------------------