Sign In New user? Start here.
kranti drive a truck "प्रमोशन मधून आर्ची आणि परश्याने काढला स्वत:साठी वेळ
 
 
zagmag

क्रांतीचा डॅशिंग अंदाज

kranti drive a truck

अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. येत्या २० मे ला प्रदर्शित झालेल्या किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी या चित्रपटात तिच्या अभिनयाची वेगळीच ‘क्रांती’ आपल्याला पहायला मिळली. वेगवेगळ्या ‘स्टंटस्’ चे टास्क क्रांतीने अगदी लीलया केले आहेत. क्रांतीने नेमके असे कोणते स्टंट केले हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असालच. या चित्रपटात क्रांतीने चक्क ट्रक चालवला आहे. एवढंच नाही विहिरीत पोहणं असो की पॅराग्लायडिंग या स्टंटचाही रोमांचकारी अनुभव तिने यामध्ये घेतला आहे. तसेच सापासोबतच एक थरारक दृश्यही तिने यात साकारलं आहे.

ट्रक चालवणं, विहिरीत पोहणं, पॅराग्लायडिंग या सर्वांसाठी क्रांतीने रीतसर ट्रेनिंग घेतलं. त्याचं टेक्निक जाणून घेत हे स्टंटस् केले. ताप असतानाही विहिरीत पोहण्याचा सीन क्रांतीने जिद्दीने पूर्ण करत कलेप्रती असलेली बांधिलकीच जपली. हे स्टंट करणे माझ्यासाठीही तितकेच रोमांचकारी असल्याचं सांगत किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी हा चित्रपट माझ्यासाठी वेगळा अनुभव असल्याचं क्रांती आवर्जून सांगते.

किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी या सिनेमाचा कथाविस्तार व दिग्दर्शन कांचन अधिकारी यांचं आहे. लेखन आशिष पाथरे यांचं आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचं असून संकलन आनंद दिवान यांचं आहे. कांचन अधिकारी व ओम गहलोट निर्मित व पियुष गुप्ता सहनिर्मित या चित्रपटात सुबोध भावे, क्रांती रेडकर, मोहन जोशी, अविष्कार दारव्हेकर, प्रिया मराठे, नम्रता आवटे, माधवी गोगटे, धनंजय मांजरेकर, अमित कल्याणकर व बालकलाकार उर्मिका गोडबोले यांच्या भूमिका आहेत.

------------------------------------------.