Sign In New user? Start here.
kumar sanu new marathi song halke halke"कुमार सानू यांचे "हलके हलके" बोल...
 
 
zagmag

कुमार सानू यांचे "हलके हलके" बोल...

मराठी सिनेविश्वात सध्या अनेक बदल होत आहेत. मराठी सिनेमा आपल्या कक्षा रूंदावत प्रगती करतो आहे. मराठी सिनेमांच्या चांगल्या कथा नवीन निर्मात्यांना आकर्षित करीत आहेत. ब्रम्हांडनायक मुव्हीज या निर्मितीसंस्थेने 'ढोल ताशे' हा आशयघन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणला होता. असाच अजून एक आशयघन सिनेमा ब्रम्हांडनायक मुव्हीज आणि ए .आर फिल्म्स एकत्रित निर्मिती असलेला 'हलके हलके' हा सिनेमा लवकरचं आपल्या भेटीला येणार आहे.

नुकतचं कुमार सानू यांच्या सुरेल आवाजात या सिनेमातील एक रोमँटिक गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे. "हलके हलके बोलणे" असे या गाण्याचे बोल असून हे गाणं सगळ्यांच्या मनात राज्य करेल यात शंका नाही. सिनेमाच्या निर्मात्या ए. अनूराधा यांचे हे गायिका म्हणून पहिले गाणे असले तरी त्यांनी कुमार सानू यांना मोलाची साथ दिली आहे. 'ढोल ताशे' या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पर्दापण करणारे राज अंजूटे 'हलके हलके' या सिनेमातून दिग्दर्शनात पर्दापण करीत आहेत. सिनेमातील कलाकारांची नावे मात्र गुलदस्त्यातचं ठेवण्यात आली आहेत. ए.आर.फिल्मसच्या ए अनूराधा आणि ब्रम्हांडनायक मुव्हीजच्या स्मिता अंजूटे यांची निर्मिती असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करेल, यात शंका नाही.

 

------------------