Sign In New user? Start here.
small-sachin-connedअभिनेत्रींची मकर सक्रांत
 
 
zagmag

अभिनेत्रींची मकर संक्रांत

makar sankrant 2016

मकरसंक्रात सणाला एक विज्ञान आहे.

आपल्या प्रत्येक सणात आणि त्यातील परंपरेत एक विज्ञान दडलेलं आहे, आपण त्यामागील शास्त्राला 'प्रथा' म्हणतो. या दिवसात वातावरण थंड असते. अशावेळी तीळ हे शरीरात उष्णता आणि उर्जा निर्माण करण्याचे काम करतात. त्यामुळेच संक्रातीच्या निमित्ताने तिळगुळ करतो. त्या पदार्थाचा गोडवा आपल्या नात्यातही यावा म्हणून ही पद्धत जुन्या काळापासून चालत आली आहे. मकरसंक्राती सणाच्या माझ्याकडे अनेक आठवणी आहे. त्यातील एक विशेष म्हणजे, एकदा मकरसंक्रातीत मी बडोद्याला माझ्या नातेवाईकांकडे गेले होते, तिथे मकरसंक्रात जल्लोषात साजरी करतात. रंगबिरंगी पतंगांनी भरलेलं आकाश मी पहिलं आहे. तिथे एका कार्यक्रमात मी 'बाई मी पतंग उडवीत होते' या गाण्यावर लावणी सादर केली होती, माझ्या या लावणीला प्रेक्षकांनी अक्षरश: उचलून धरले होते, तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. शिवाय यंदाची मकरसंक्रात ही माझ्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. यंदा माझा १५ जानेवारी रोजी 'शासन' सिनेमा प्रदर्शित होत आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच हा सिनेमा प्रदर्शित होत असल्यामुळे मी खूप उत्साही आहे.

नृत्यागंना अभिनेत्री - अदिती भागवत

________________________________________________________________________

मॅनेजमेण्ट, टीम वर्क शिकवणारा सण.

माझं बालपण डोंबिवलीत गेलं. आमच्या डोंबिवलीत मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकूवाचा मोठा कार्यक्रम असायचा. आईपासून आजीपर्यंत प्रत्येकजणी हळदीकुंकूवाचा कार्यक्रम मनापासून करायच्या. मी देखील त्यात सहभागी व्हायचे, घरी आलेल्या सुवासिनींना फूल देणं, अत्तर लावणं, वाण देणं अशी कामं आम्ही बहिणी आपापसात वाटून घ्यायचो. खरं सांगायचं तर हळदीकुंकूचा हा कार्यक्म मॅनेजमेण्ट, टीम वर्कचं उत्तम ट्रेनिंग देणारा असायचा ज्यामुळे रिलेशन बिल्डअप करण्यासाठी लागणाऱ्या लहान मोठ्या त्यामाध्यमातून कळायच्या. हल्लीच्या काळात या सर्व गोष्टी लुप्त होत चालल्या आहेत. पूर्वी मकरसंक्रांतीचा हा कार्यक्रम प्रत्येक घराघरात आठवडाभर तरी चालत असे, मात्र आता तो उत्साह आणि सण एका दिवसातच संपतो. मला सुद्धा माझ्या घरात हळदीकुंकू घालायची भरपूर इच्छा आहे, पण माझ्या आगामी 'फोटोकॉपी' सिनेमाच्या गडबडीत फारसं शक्य होत नाही. नेहा राजपाल प्रॉडक्शन हाउसची निर्मिती असलेला हा सिनेमा लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मला तिळाचे लाडू भरपूर आवडतात, पण त्यासाठी मी मकरसंक्रांतीची वाट नाही बघत. अगदी गणपतीला देखील माझ्याकडे तिळगुळाचे लाडू पाहायला मिळतील.

गायिका निर्माती - नेहा राजपाल

_________________________________________________________________________________

उल्हासित करणारी संक्रांत

मकरसंक्रांत हा विषय म्हटलं तर बडोद्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तिथे पतंगांची अक्षरश : आतषबाजी सुरु असते. या दिवसांमध्ये मकरसंक्रांती बद्दल काहींच्या मनात गैरसमज असतात. संक्रांत आली म्हणजे आपल्यावर संकट घेऊन आली. पण मी तसं अजिबात मानत नाही. अंधश्रद्धा हा शब्दचं मुळात माझ्या डिक्शनरीत सापडणार नाही. सण हे आनंद साजरे करण्यासाठी असतात, भाकड समजुती मनात घर धरून भीती बाळगत बसण्याचा काय फायदा.याच सणा समारंभाच्या निमित्ताने आपण एकत्र आलो तर आपल्यातील नाती देखील घट्ट होतील. याच विषयाशी निगडीत माझा आगामी 'बंध नायलॉनचे' येत्या २९ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री - श्रुती मराठे

_________________________________________________________________________

हल्लीचे सण मोबाईल मेसेजिंगवरच साजरे केले जातात.

 

आता कुठल्याही सणांना पूर्वीसारखी मजा आणि रंगत राहिली नाहीये. आताच्या काळात मोबाईलवर शुभेच्छा पाठवून सण साजरा केला जातो. मकरसंक्रांत सणाची देखील तीच अवस्था झाली आहे. माझ्या लहानपणी आम्ही सगळ्या मैत्रिणी काळ्या साड्या नेसून तिळगुळ घ्यायला शेजारी जायचो. आमचे शेजारचे देखील आम्हाला आवडीने त्यांनी केलेले तिळाचे लाडू, गुळ पोळी, हलवा देत असत. एका डब्ब्यात हे सारे गोडपदार्थ गोळा केल्यानंतर आम्ही सगळ्याजणी संध्याकाळी एकत्र येउन मस्त पार्टी करत असू. मकरसंक्रातीची खास गुळपोळी आजही मला भरपूर आवडते. मला आठवते कि, आई मला त्यावरून भरपूर ओरडायची देखील! आजही खास गुळपोळी खाण्यासाठी मी मकरसंक्रांतीला माझे सर्व डाएट बाजूला ठेवते. अशी मज्जा आजकालच्या लहान मुलांना घेताच येत नाही, याची खंत वाटते. यंदाची मकरसंक्रांत माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. माझे सासर पंजाबी असल्याकारणामुळे तिथे लोढी हा सण या दिवसात साजरा केला जातो. लोढीला रेवडी हा गोडपदार्थ तिथे खातात. त्यामुळे यंदाची माझी मकरसंक्रात दोन दिवस आधीच सुरु होणार असून ती मी खूप एन्जॉय करणार आहे.

अभिनेत्री रीना वळसंगकर

_________________________________________________________________

पतंगाची दोर मृत्यूची दोर बनू देऊ नका.

मकरसंक्रात हा सण उत्साहाचा आणि उल्हासाचा असतो. 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' असे आपण यावेळी बोलतो. दूर गेलेल्या माणसांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो. असा हा माणुसकीचे बंध जपणारा उत्सव एखाद्याच्या जीवाशी खेळणारा नसावा. असा मला संदेश द्यावासा वाटतो. मकरसंक्रांतीला पतंग उडवण्याची पद्धत आहे, मात्र या पतंगाच्या दोरीमुळे आपल्या हातून पक्ष्यांचा नाहक मृत्यू होत आहे, याचे भान आपल्याला नसते. आकाशात उडणाऱ्या निर्दोष पक्ष्यांचा या पतंगाच्या मांजामुळे जीव धोक्यात येतो त्यामुळे मकरसंक्रातीच्या सणावर मृत्यूचं सावट पडू देऊ नका. मी दरवर्षी काळ्या रंगाचे आउट फिट घालून अशाचप्रकारे मकरसंक्रात साजरी करते. यंदाचे वर्ष माझ्यासाठी खास आहे, कारण या वर्षाच्या सुरुवातीलाच माझा 'वृंदावन' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. मकरसंक्रातीच्या तिळगुळाचा गोडवा प्रेक्षक माझ्या सिनेमासाठी देखील राखून ठेवतील अशी मी आशा करते. तुम्हा सगळ्यांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.

अभिनेत्री पूजा सावंत

________________________________________________________________________

बडोद्याची मकरसंक्रात खूप मिस करते.

मकरसंक्रांत हा माझा सगळ्यात फेव्हरेट सण आहे. मी मुळची बडोद्याची, आमच्या बडोद्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मला आठवतेय की, आम्ही सगळेजण पतंग उडवायला एकत्र गच्चीत जमायचो, संपूर्ण आकाश रंगबिरंगी पतंगाने भरून जायचे. संध्याकाळी ७ वाजल्यानंतर दिवाळीत जेवढे फटाके फोडले जात नाही, तेवढे फटाके आम्ही मुलं मकरसंक्रांतीला फोडायचो. या सणात काळे कपडे घालायची पद्धत आहे, खर तर घरच्या सुहासिनी बायका काळ्या साड्या नेसतात, पण आम्ही मुलेही काळी कपडे घालण्याची आमची हौस भागवून घ्यायचो. आजही तशी पद्धत आहे. शिवाय मकरसंक्रात म्हंटला तर तिळगुळ हे आलंच. माझ्या लहानपणी आई तीळगुळामध्ये २५ किवा ५० पैसाच नाणं टाकायची. आई त्याला गुप्तदान असं म्हणायची, ज्याला कोणाला तो लाडू मिळेल त्याला ते गुप्तदान मिळायचं. त्या पैसांसाठी मी एकदा तर तिळगुळाचा अक्खा डब्बाच फस्त केला होता. गेली १० वर्ष मी बडोद्यात गेली नाहीये, त्यामुळे मी बडोद्याची मकरसंक्रात खूप मिस करते.आहे. 'मिस्टर एन्ड मिसेस सदाचारी' हि माझी फिल्म प्रदर्शनाच्या वाटेवर आहे, त्यामुळे या मकरसंक्रतीला मी मुंबईतच असणार आहे. या वेळची संक्रात मी 'मिस्टर एन्ड मिसेस सदाचारी'च्या टीमसोबतच साजरा करेल. या फिल्मच्या माध्यमातून आणि मकरसंक्रांतीच्या कृपेने माझे करिअर पतंगाप्रमाणे उंच आकाशात भरारी घेईल अशी मी आशा करते.

अभिनेत्री - प्रार्थना बेहेरे

--------------------------

------------------