Sign In New user? Start here.
small-sachin-connedशासन सिनेमाच्या निमित्ताने मकरंद आणि वृंदा पुन्हा एकत्र
 
 
zagmag

शासन सिनेमाच्या निमित्ताने मकरंद आणि वृंदा पुन्हा एकत्र

youthful bharud

सकस अभिनय गंभीर विषय मांडणाऱ्या दिग्दर्शकांच्या यादीत गजेंद्र आहिरे यांच्या सिनेमाचे नाव आग्रहाने घेता येईल. त्यांची शासन ही आणखी एक कलाकृती येत्या १५ जानेवारी २०१६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह गोव्यात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने राजकारणातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या सिनेमाची खासियत म्हणजे मकरंद अनासपुरे आणि वृंदा गजेंद्र अहिरे यांची जोडी पुन्हा एकदा शासन सिनेमातून पाहायला मिळणार आहे. त्यांनी यापूर्वी देखील 'सुंबरान','पारध' सिनेमातून मकरंद आणि वृंदाचा कसदार अभिनय प्रेक्षकांनी अनुभवला आहे. शासन सिनेमात मकरंदने आय ए एस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे तर वृंदाने त्याच्या सहचारिणीची जी व्यवसायाने वकील असते. निर्माता शेखर पाठक यांच्या श्रेया फिल्म्स प्रा. लि. या बॅनरची निर्मिती असलेल्या सिनेमात या दोघांसोबतच अभिनेता भारत जाधव, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, मनवा नाईक, अदिती भागवत,वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले,मोहन जोशी, नागेश भोसले, डॉ . श्रीराम लागू, अमेय धारे, किरण करमरकर अशी मोठी स्टारकास्ट आहे.

--------------------------

------------------