Sign In New user? Start here.
Meena Naik & Manva Naik New Oneकारण भगवान दादा यांच्यावर आधारीत मराठी चित्रपट येत आहे. आणि ही भूमिका मंगेश देसाई हा कलाकार साकरणार आहे
 
 
zagmag

भगवान दादांची भूमिका मंगेश साकारणार

mangesh desai doing a role of  bhagwan dada

"भोली सुरत दिल के खोटे" हे गाणं ऎकल्यावर कोणाची आठवण येतं बरं काही अंदाज? जर भगवान दादा यांच नाव घेत असाल तर तुम्ही अगदी बरोबर आहात. त्यांची स्वत:ची अशी नृत्यशैली आणि अभिनयामुळे ते एके काळचे प्रसिध्द अभिनेते होते. आजही बरेचदा आपल्या वेगळ्याच डान्स शैलीमुळे अनेकांच्या मनात त्यांच वेगळ स्थान आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या पासून अनेक कलाकारांनी त्यांची डान्सशैली फॉलो केली आहे. एवढ सगळ सांगण्यामागच एकच कारण आहे.

कारण भगवान दादा यांच्यावर आधारीत मराठी चित्रपट येत आहे. आणि ही भूमिका मंगेश देसाई हा कलाकार साकरणार आहे . या चित्रपटाच दिग्दर्शन शेखर सरतांडेल करणार असून ५ ऑगस्टपासून याचे चित्रीकरण ही सुरू झाले आहे.गेल्या तीन वर्षांपासून काही अडचणीमुळे हा सिनेमा रखडला होता. पण आता हा सिनेमा नव्या टीमसोबत सुरू करण्यात येणार आहे. भगवान दादांचा "अलबेला" हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. भगवान दादा जेवढे लोकप्रियतेच्या शिखरावर होते पण आयुष्याच्या शेवटी यांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.

 

------------------