Sign In New user? Start here.
"एक अलबेला”मध्ये भगवान दादा साकारणाऱ्या मंगेश देसाईची वाह! वाह!’
 
 
zagmag

“एक अलबेला”मध्ये भगवान दादा साकारणाऱ्या मंगेश देसाईची वाह! वाह!

neha's character yutika

सिनेसृष्टीत एखादी लाट आली की त्या लाटेच्या प्रवाहात सगळेच वाहताना दिसतात. अशीच एक लाट हल्ली सिनेसृष्टीत आली आहे आणि ती म्हणजे जीवनपटांची...आपल्या आयुष्यात कतृत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा जीवनपट पडद्यावर साकारणे ही त्या अभिनेत्यासाठी जेवढी मानाची गोष्ट असते, तेवढीच कसोटीही असते. ज्या नटाने प्रेक्षकांना भरभरून दिले असा नट पडद्यावर साकारणे हे आव्हानच....अशाच आव्हानाला तोंड दिले अभ्यासू अभिनेता मंगेश देसाई याने...

बॉलीवूडमध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या भगवान दादांचा जीवनपट उलगडणारा “एक अलबेला” हा चित्रपट येत्या 24 जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पाया रचला जात असताना भगवान दादांची भूमिका कोण साकारणार? हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. प्रत्येक अभिनेत्याच्या लूक्सवर विचार झाल्यावर दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी मंगेश देसाई या नावावर शिक्कामोर्तब केली. तोपर्यंत मेक-अप साठी विद्याधर भट्टे असतील हे ठरले होते..आणि त्यांनी भगवान दादांसोबत काम केले असल्याने...त्यांच्या चेहऱ्याची ठेवण विद्याधर यांना माहित होती. त्यामुळे लूक्स च्या बाबतीत विद्याधर भट्टे अचूक भगवान दादा उभे करतील यासाठी निर्माते – दिग्दर्शक निश्चिंत होते. चित्रपटाच्या कथेचे वाचन झाले. मंगेश देसाई याने लागलीच या चित्रपटासाठी आपला होकार कळवला....मात्र तो भगवान दादांची भूमिका मी कितपत पेलू शकेन यासाठी थोडा साशंक होता. पण दिग्दर्शकांच्या सांगण्यावरून त्याने आपल्या तयारीला सुरूवात केली. एवढी वर्ष प्रेक्षकांचे प्रेम अनुभवणारा हा अवलिया पडद्यावर साकारणे तितकेसे सोपे नव्हते, यासाठी अभिनेता मंगेश देसाई याला बरीच मेहनत घ्यावी लागली. तर मंगेश देसाई भगवान दादांसारखा दिसावा यासाठी त्याच्या लूक बरोबर त्याच्या हेअर स्टाईलिंग वर काम केल्याचे मेक-अप आर्टीस्ट विद्याधर भट्टे यांनी म्हटले.

भगवान दादांच्या लकबी, त्यांचे हावभाव,त्यांची बोलण्याची पध्दत, त्यांच्या ऍक्शन्स आणि अनोख्या नृत्यशैलीसाठी प्रसिध्द असणारे ते...यासगळ्यांचा मेळ मंगेश देसाई यांना घालायचा होता. भगवान दादा असा नट आहे, ज्याने सिनेसृष्टीला भरभरून दिले मात्र त्याच्या फार कमी गोष्टी आज अभ्यासण्यासाठी आहेत. “अलबेला” हा चित्रपट सोडला तर भगवान दादांची इतर कोणतीही कलाकृती आज उपलब्ध नाही. याविषयी बोलताना मंगेश देसाई म्हणाले, “मला कळल्याक्षणापासून मी बाकी सगळी कामे बाजूला सारून केवळ भगवान दादांचा अभ्यास केला.” तब्बल 22-25 वेळा “अलबेला” पाहिल्याचे, ते पुढे म्हणाले. या चित्रपटातील भगवान दादांचे बारकावे त्यांनी नीट अभ्यासले. मंगेशची ही मेहनत फळाला आली. चित्रपटाचा पहिला सीन शूट झाला आणि निर्मात्यांची शाबासकी मिळवण्यात मंगेश यशस्वी झाला. मंगेशने साकारलेले भगवान दादा पाहून...”माझा निर्णय चुकला नसल्याचे” निर्मात्यांनी म्हटले. शूटींगचा काळ हा मंगेशसाठी परिक्षेचा काळ होता. आदल्या दिवशी शूट संपवायचे आणि दुसऱ्या दिवशीच्या सीन्सची माहिती काढून त्यासाठी पुन्हा अलबेला पाहून त्या सीन्स ची रिहर्सल करायची, शूटींग दरम्यान हा मंगेशचा दिनक्रम होता. नेहमीच आपल्या भूमिकेसाठी कष्ट घेणाऱ्या मंगेशची मेहनत फळाला आली. चित्रपटाचा नुसता टीझर लाँच झाला आणि मंगेश प्रेक्षकांची दाद मिळवण्यात यशस्वी झाला.

------------------------

------------------------------------------.