Sign In New user? Start here.
manisha kelkar now acted in south film "ह्राधिका, नेहा नंतर आता मनीषाची साऊथमध्ये वर्णी
 
 
zagmag

राधिका, नेहा नंतर आता मनीषाची साऊथमध्ये वर्णी

manisha kelkar now acted in south film

मनीषा केळकरंच. ’यांचा काही नेम नाही, वंशवेल, बंदूक अशा अनेक चित्रपटांमधून आणी झुंज सारख्या रिअ‍ॅलिटी शोमधून झळकलेली मनीषा ग्लेया काही महिन्यांपासून तशी प्रसिध्दीपासून लांब होती. मराठीत तिची फार चर्चा नसली तरी दक्षिणेत मात्र तिच्या हिरो गिरीची जोरात चर्चा सुरू आहे. कारण आता मनीषाने फ्रेंड रिक्वेस्ट या चित्रपटव्दारे साऊथच्या इंडस्ट्रींमध्ये पाऊल ठेवलं आहे. पल्लवी सुभाष, राधिका आपटे, श्रुती मराठे, नेहा पेंडसे या यादीत आता मनीषाच्या नावाची भर पडली आहे.

दिग्दर्शक आदित्य ऒम दिग्दर्शित या सिनेमांच शुटू पूर्ण झालं असून तेलुगू आणि हिंदी अशा दोन भाषांत हा चित्रपट बननार आहे. दक्षिणेतला माझा हा पहिलाच सिनेमा. ही अ‍ॅक्शन हॉरर फिल्म असून यात मी बरेच स्टंट केलेत. त्यासाठी मार्शल आर्टच प्रशिक्षणही मी घेतलं. एक सायको अ‍ॅनालिस्टची भूमिका मी यात साकारतेय. असं मनीषा सांगते.तिथल्या भाषेबद्दल बोलताना ती म्हणाली मला तेलगु शिकवायला एक प्रॉम्पटर होता. तिथले उच्चार महत्वाचे असतात. त्या भाषेची लय, लहेजा समजून घेतला की मग गोष्टी सोप्या होतात. आदित्य ऒम यांचा बंदूक हा हिंदी चित्रपट मनीषाने केला होता. त्यातली तिची अ‍ॅक्शन आणि एनर्जी बघून तिला या सिनेमाची ऑफर आली. दक्षिणेत काम करतानाच तिने मराठीतही नव्याने काही चित्रपट घेतले आहेत. अंश वय १६ हे यापैकी काही चित्रपट आहेत.

------------------------------------------.