Sign In New user? Start here.
Mansi Naik to portray role of a motherमराठी नायिका मानसी नाईक हिच्या नव्या इनिंगला सुरूवात होतेय असे म्हणायला हरकत नाही. आपल्या आगामी चित्रपटात चक्क आईची भूमिका साकारतेय.
 
 
zagmag

मानसी नाईक चक्क आईच्या भूमिकेत

Mansi Naik to portray role of a mother

मराठी नायिका मानसी नाईक हिच्या नव्या इनिंगला सुरूवात होतेय असे म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत विवध मराठी सिरिअल्स आणि चित्रपटांतून भूमिका साकारलेली ही महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आपल्या आगामी चित्रपटात चक्क आईची भूमिका साकारतेय. दिग्दर्शक Rohan यांच्या आगामी The Shadow या हॉरर थ्रीलर पठडीच्या चित्रपटासाठी मानसीने अगदी कमी वयात अशा प्रकारची चरित्र भूमिका स्वीकारण्याचे धाडस दाखवले आहे. मराठी इंडस्ट्रीतील अनेक बहुश्रुत चेहऱ्यांनी नकार दिलेल्या या विशिष्ट भूमिकेला स्वीकारणाऱ्या मानसीचा हा पहिलाच हॉरर थ्रीलर चित्रपट असेल.

एका अमेरिकेहून परतलेल्या आईची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी मानसीला एका आठवड्याचे स्पेशल ट्रेनिंगही घ्यावे लागणार आहे. त्यामुळे आतापर्यंत गाजलेल्या आयटम नंबर्स मधून प्रेक्षकांच्या समोर आलेली मानसी या अमेरिकन आईच्या भूमिकेला कितपत न्याय देऊ शकेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

------------------