Sign In New user? Start here.
Marathi Actor Siddharth Jadhav to play guest role in Bollywood movie 'Gour Hari Dastaan पण आता पुन्हा सिध्दू हिंदी चित्रपटात दिसणार आहे. गौर हरी दास्ताना या चित्रपटात पाहुणा कलाकाराच्या एंजटच्या छोट्य़ा भूमिकेत तो दिसणार आहे.
 
 
zagmag

सिध्दू पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत

हिंदी आणि मराठीत दोन्ही चित्रपटसृष्टीत दिसणारे मराठी कलाकार फारंच थोडे आहेत. त्यातलच नावं म्हणजे सिध्दार्थ जाधव. सिध्दार्थ मध्यंतरी गोलामाल चित्रपटात दिसला आणि त्यानंतर तो कॉमेडी सर्कस मधे त्यांने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकून घेतली होती. पण त्यानंतर मात्र सिध्दू मराठी चित्रपटांमधे लीड रोल मधे दिसायला लागला. पण आता पुन्हा सिध्दू हिंदी चित्रपटात दिसणार आहे. गौर हरी दास्ताना या चित्रपटात पाहुणा कलाकाराच्या एंजटच्या छोट्य़ा भूमिकेत तो दिसणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केल असून सिद्धार्थसोबत विनय पाठक, कोंकणा सेन – शर्मा, दिव्या दत्ता असे बडे कलाकार देखील या चित्रपटात आहे. बकुळा नामदेव घोटाळे, दे धक्का , गोलमाल चित्रपटात तो कॉमेडी रोल मधे दिसला होता. या चित्रपटात त्याची कोणत्याप्रकारची भूमिका आहे याबाबत अजून समजू शकले नाही.कॉमेडी कलाकार म्हणून सिध्दूला चित्रपट सृष्टित ऒळखल जातं. त्यामुळे या चित्रपटात नेमकी कोणत्याप्रकारची भूमिका सिध्दू करतोय याबाबत त्यांचे चाहतेही उत्सुक असतील.

 

------------------