Sign In New user? Start here.
small-sachin-conned अनुराग" चित्रपटाच्या नायकावर कायदेशीर बडगा"
 
 
zagmag

"अनुराग" चित्रपटाच्या नायकावर कायदेशीर बडगा !!

marathi-film anuraags producers files 2 crore defamation case against lead actor

अनुराग’ या बहुचर्चित आगामी चित्रपटाच्या नायकावर धर्मेंद्र गोहेल ह्यांच्यावर चित्रपटाचे निर्माते डॉक्टर अंबरीश दरक ह्यांनी कराराचा भंग केल्याबद्दल कायदेशीर नोटिस काढली आहे.

डॉक्टर अंबरीश दरक लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित ‘ अनुराग’ ह्या दोनच पात्र असलेल्या परंतु बहुआयामी आगामी चित्रपटाचे नायक धर्मेंद्र गोहेल हे चित्रपटाच्या चित्रिकरणानंतर, चित्रपटाच्या कोणत्याही प्रसिद्धी कार्यक्रमांना (promotional activities ला ) उपस्थित राहिले नसल्यामुळे , त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्या बरोबर केलेल्या कराराचा भंग केला असून नुकसान भरपाई म्हणून डॉक्टर अंबरीश दरक ह्यांनी वकिलांमार्फत नुकसान भरपाईचा दावा दाखल करणारी नोटिस पाठवली आहे.

११ मार्च २०१६ ला प्रदर्शित होणाऱ्या ह्या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांना चित्रपटाची नायिका मृण्मयी देशपांडे ह्या एकट्याच उपस्थित असायच्या आणि अभिनेता धर्मेंद्र गोहेल ह्यांना वेळोवेळी कळवून सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. त्यामुळे निर्मात्याला चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांना (promotional activities ) अनेक ठिकाणी कमतरता जाणवत गेल्या. ह्या प्रकरणातून निर्मात्याला झालेला मनस्ताप आणि आर्थिक नुकसान पाहता निर्मात्याने हे कायदेशीर पाऊल उचलले आहे.