Sign In New user? Start here.
>marathi school run by martahi actors  शाळां सावरण्यासाठी ५ मराठी कलारांनी पुढाकार घेतला आहे.आदेश बांदेकर, शरद पोंक्षे, सुबोध भावे, अमोल कोल्हे आणि दिगंबर नाईक यांनी कुर्ल्या झोपडपट्टी मधील हरिहर भागामधील संत सेवा मंडळाची ‘प्रबोधन कुर्ला ही शाळा दत्तक घेतली आहे.

marathi school run by martahi actors

 
 
zagmag

मराठी शाळांसाठी मराठी कलाकारांचा पुढाकार

आजकल मराठी भाषा, मराठी बाणा याच्या खूप गोष्टी केल्या जातात. पण स्वत:च्या मुलांना शाळेत पाठवण्याची वेळ येते तेव्हा पालकांचा जास्त कल हा इंग्लिंश मिडीयमकडे जास्त असतो. त्याचा परिणाम मराठी शाळांवर होतो. याच्यावर फक्त चिंता व्यक्त करण्याशिवाय कॊणी काही करत नाही. पण आता या शाळां सावरण्यासाठी ५ मराठी कलारांनी पुढाकार घेतला आहे.आदेश बांदेकर, शरद पोंक्षे, सुबोध भावे, अमोल कोल्हे आणि दिगंबर नाईक यांनी कुर्ल्या झोपडपट्टी मधील हरिहर भागामधील संत सेवा मंडळाची ‘प्रबोधन कुर्ला ही शाळा दत्तक घेतली आहे.

या शाळेतील पहिली ते दहावीच्या 500 विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता हेरून त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला जाईल. आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात नेऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेतील मुलांनी रंगमंचावर जाऊन दिंडी, भजन, भारुड, अभंग सादर केले. या उपक्रमाबद्दल बोलताना आदेश बांदेकर यांनी माहिती दिली की शिवसेना चित्रपट सेनेच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. गरीब मुलांमध्ये ही टॅलंट असत पण त्यांना संधी मिळत नाही त्यांना ही संधी देण्याच काम आम्ही करणार आहोत.

------------------