Sign In New user? Start here.
milind soman got the title of ironman मिलींद ने आता वयाच्या पन्नासाव्या वर्षी आयरनमॅन हा किताब पटकावला आहे. १९ जुलै रोजी स्विझरलॅंड्च्या ज्यूरिखमध्ये झालेल्या स्पर्धेमधे त्याने हे यश मिळवल आहे
 
 
zagmag

मराठी मुलगा मिलींद सोमण झाला आयरनमॅन

मिलींद सोंमण हे नाव घेताच आपल्या डॊळ्यासमोर उभा राहतो तो एक मॉडेल, अभिनेता हो ना? पण तुम्हाला माहिती आहे का मिलींद एक चांगला खेळाडू आहे. मॉडेल किंवा अभिनेता म्हणून काम करण्याअगोदर त्याने त्याच करीयर एक खेळाडू म्हणून सुरू केलं होतं. याच मिलींद ने आता वयाच्या पन्नासाव्या वर्षी आयरनमॅन हा किताब पटकावला आहे. १९ जुलै रोजी स्विझरलॅंड्च्या ज्यूरिखमध्ये झालेल्या स्पर्धेमधे त्याने हे यश मिळवल आहे.

मिलिंद म्हणतो की, वयाच्या ५० व्या वर्षानिमित्त काही तरी आव्हानात्मक थ्रिलींग अस काम करण्याची इच्छा होती. आणि ते मी पूर्ण करू शकलो याचा मला खूप आनंद आहे. या स्पर्धेत सायकलिंग ८ तासाहून अधिक वेळेत पूर्ण करणे आणी ४२ किमीची धाव माझ्यासाठी नवीन होती. ज्यूरीखच्या तलावात पोहणं हा एक चांगला आणि मस्त अनुभव होता . या स्पर्धेत सात भारतीयांनीही सहभाग घेतला होता त्यामधील ५ जणांनी ही स्पर्धा पूर्ण केली.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार विश्व ट्रायथलॉन कार्पोरेशन द्वारा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ट्रायथलॉन ही स्पर्धा जगातील सर्वात कठीण स्पर्धा समजली जाते. जगभरातून २००० खेळाडूंनी या स्पर्धेमधे सहभाग घेतला होता. ३.८ किमी. स्विमींग, १८०.२ किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी रनिंग असे हे स्पर्धेचे स्वरूप होते. १६ तासाहून कमी वेळात ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्याला आयरनमॅन हा किताब दिला जातो. मिलिंद सोमण यांनी पहिल्यांदा या स्पर्धेत सहभागी होऊन १५ तास १९ मिनिटांत पूर्ण केली.

 

------------------