Sign In New user? Start here.
neha joshi and sidharth jadhav working together in Drem mallसिध्दार्थ जाधव आणि नेहा जोशी पहिल्यांदा एकत्र मोठया पडद्यावर दिसणार आहेत. या वेगळ्या धाटणीचा सिनेमा मधे सिध्दार्थ जाधव सलग १५ दिवस नेहाजोशीला मारत असतो. एकदंरित या गोष्टीवरून तुमच्या लक्षात येईल की नेमक चित्रपटात काय होणार आहे..
 
 
zagmag

सिध्दार्थ आणि नेहा जोशी पहिल्यांदा एकत्र मोठ्या पडदयावर

सिध्दार्थ जाधव आणि नेहा जोशी पहिल्यांदा एकत्र मोठया पडद्यावर दिसणार आहेत. या वेगळ्या धाटणीचा सिनेमा मधे सिध्दार्थ जाधव सलग १५ दिवस नेहाजोशीला मारत असतो. एकदंरित या गोष्टीवरून तुमच्या लक्षात येईल की नेमक चित्रपटात काय होणार आहे. व्हाईट लाईन प्रस्तुत "ड्रिम मॉल"हा चित्रपट दिग्दर्शक सुरज मुळेकर तर याची निर्मिती रेखा पेंटर सह निर्माता विजय वैद्य यांनी केली आहे येत्या २६ जून ला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रदर्शित होत आहे.

हि कथा आहे एका रात्रीची… एक रात्र… सई २२ वर्षाची मुलगी… ड्रिंम मॉल मधल्या ऑफिस मध्ये काम करते. एक दिवस तिला ऑफिस मधून निघायला उशीर होतो… आणि ती अडकते त्या मॉल मध्येच … मॉल चा सुरक्षा रक्षक तिला स्वतः च्या सापळ्यात अडकवतो … आणि सुरु होतो एक खेळ … मानवी मनाच्या अनाकलीन भावना आणि तिचा प्रवास … एका रात्रीचा संपूर्ण बंद मॉल मध्ये होणारा पाठलाग आणि सई चा प्रतिकार स्वतःचा जीव आणि शिव वाचवण्यासाठी केलेली धडपड …. हि धडपड फक्त सई ची नाही तर आज घराबाहेर पडणाऱ्या अनेक तरुणींची ,स्त्रियांची आहे जी सई च्या माध्यमाच्या या चित्रपटात मांडलेली आहे.

काय होते त्या रात्री? सई सुटते कि संपते ? कि सई संपवते? आयुष्यात आलेली एक रात्र सई ला कुठल्या वळणावर नेऊन ठेवते ? या चित्रपटात मुख्य कलाकार सिद्धार्थ जाधव, नेहा जोशी आहेत तर सह कलाकार ओमकार कुलकर्णी ,केदार वैद्य,पूर्वा सुभाष,राहुल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.

 

------------------