Sign In New user? Start here.
 neha's look in नेहाच्या अभिनयाचा अजून एक पैलू आपण येऊ घातलेल्या निळकंठ मास्तर या चित्रपटातून अनुभवणार आहोत.
 
 
zagmag

नेहा महाजनने साकारलेली वीरांगणा

 neha's look in

मराठी सिनेइंडस्ट्रीत चांगल्या अभिनेत्रींची अजिबात कमतरता नाही. याचं सुंदर अभिनेत्रींच्या यादीत भर घालणार नाव म्हणजे नेहा महाजन...कॉफी आणि बरचं काही, सिध्दांत यासारख्या चित्रपटातून तिचं अभिनयाचं कौशल्य आपण सगळ्यांनीचं पाहिलं आहे. नेहाच्या अभिनयाचा अजून एक पैलू आपण येऊ घातलेल्या निळकंठ मास्तर या चित्रपटातून अनुभवणार आहोत.

स्वातंत्र्यवीरांच्या बऱ्याच कथा इतिहासात प्रसिध्द आहेत. या वीरांच्या खांद्याला खांदा मिळवून तितक्याचं सफाईदारपणे स्वातंत्र्याची लढाई लढणाऱ्या वीरांगणांची छवी निळकंठ मास्तर या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्यासमोर उभी राहणार आहे. नेहा महाजन या सक्षम अभिनेत्रीने स्वातंत्र्यपूर्व काळातल्या अशाच एका वीरांगणेचं व्यक्तीचित्र पडद्यावर साकारलं आहे. स्वातंत्र्याची लढाई लढताना वेळोवेळी करावं लागणारं पलायन, आपली ओळख लपवण्यासाठी केलेलं वेशभूषांतर या पार्श्वभूमीवर नेहाचे वेगवेगळे लूक्स निळकंठ मास्तर च्या निमित्ताने आपल्यासमोर येणार आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळ रंगवणाऱ्या या चित्रपटाविषयी बोलताना, ‘खऱ्या अर्थी ग्लॅमरस भूमिका साकारण्याची संधी निळकंठ मास्तरच्या निमित्ताने मिळाल्याचं’, नेहा आवर्जून सांगते.

अक्षर फिल्म्स प्रस्तुत निळकंठ मास्तर या चित्रपटाची निर्मिती मेघमाला बलबिम पठारे यांनी केली आहे. गजेंद्र अहिरेंचं दिग्दर्शन आणि अजय-अतुल यांचं संगीत असणारा निळकंठ मास्तर येत्या 7 ऑगस्टला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या नवतारकेचे निळकंठ मास्तर चित्रपटातले वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना मोहिनी घालण्यात कितपत यशस्वी होतील हे लवकरचं आपल्याला कळेलं....

 

------------------