Sign In New user? Start here.
new year resolution ""कट्यार" च्या टीम ला साक्षी ने दिली "दंगल" ची ट्रिट
 
 
zagmag

"शिवानी आणि शिवराज यांचा नविन वर्षातील संकल्प.

नवीन वर्ष म्हंटल की संकल्पांना उत येतो पण त्यातील किती संकल्प पूर्ण होतात याबद्दल मात्र प्रश्नचिन्ह असतात. पण नविन वर्षात काहीतरी चांगल करण्याच ठरवल जातंय हे ही कमी नाही का? या संकल्प करण्याच्या रेस मध्ये आपले मराठी कलाकारही मागे नाहीत. झी युवा वरील बनमस्का या मालिकेतील कलाकारांचा यावर्षिच्या संकल्पाविषयी जाणूंन घेऊया.

शिवराज: नवीन वर्ष सुरु होतंय. म्हणून एक नेहमीचा एक विधी ‘संकल्प करणे’ ह्याचा विचार मी यावर्षीही जरूर केला. पण आजवरच्या अनुभवावरून यावेळी असं ठरवलंय की फार काही कसला संकल्प करायचा नाही. कारण असं काही ठरवलं तर ते पाळावं लागतं आणि जर ते फसलं तर रुखरुख राहते. विनोद बाजूला, पण काही गोष्टी मनाशी जरूर ठरवल्या आहेतच. नवीन वर्षाच्या निमित्ताने तशी स्वत:शी खूणगाठ ही बांधलीच आहे. पण त्याचा कुठलाही गाजावाजा न करता निमूटपणे त्या तडीस नेणे यासाठी प्रयत्न जरूर करणार आहे. त्या पूर्ण झाल्यावर तुम्हाला ते नक्की कळेलही. सध्या ‘बन मस्का’ या मालिकेत काम करताना धमाल येतेय. मनात जी अनुभवांची पोतडी आहे, त्यात भरपूर मोलाचे अनुभव, आठवणींची भर दररोज पडतीये. आमच्या शीर्षकगीतात म्हटलंय त्याप्रमाणे ‘स्ट्रेस बाजूला ठेवत जगण्याचा चस्का’ लागतोय. नवीन वर्षाच्या निमित्ताने माझं आपल्या सर्वांना हेच आवाहन आहे. आपणा सर्वांना भरभरून शुभेच्छा आणि प्रेम हे आहेच.

शिवानी: नवीन वर्षाचं माझं रीजोल्युशन ‘पॉझिटिव्ह राहणं आणि हीच पॉझिटिव्हिटी इतरांनाही देणं’ हे आहे. आपण खूप कामात असतो, त्या कामाचा बऱ्याचदा भरपूर स्ट्रेस आपल्यावर येतो आणि बऱ्याचदा आपल्याला स्ट्रेस येतोय याच गोष्टीकडे आणि पर्यायाने स्वत:कडे आपलं दुर्लक्ष होतं. त्याचा परिणाम आपल्या स्वत:च्या मनावर, शरीरावर, नातेसंबंधावर पडतो. त्यामुळे येत्या वर्षात स्वत:च्या मनाची, शरीराची नीट काळजी घेऊन, शक्य तितकं ‘पॉझिटिव्ह’ स्वत:ला ठेवणे आणि हीच पॉझिटिव्हिटी इतरांनाही देणं हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. माझं मन आणि शरीर जर हेल्दी असेल, तर मी उत्तम काम करू शकेन आणि उत्तम नाती जोडू शकेन. त्यासाठी चांगली पुस्तकं सतत वाचणं, उत्तम फिल्म्स बघणं, चांगल्या लोकांमध्ये रमणं, जमेल तश्या १-२ नवीन गोष्टी शिकणं हे सर्व मी करणार आहे. हीच पॉझिटिव्हिटी तुम्हा सर्वांच्या आयुष्यात येवो आणि ह्या वर्षात आपणा सर्वांच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह घडो, हीच माझी सदिच्छा.

 

------------------