Sign In New user? Start here.

नो स्मोकींग झोन...

No Smoking on the sets of Classmates  लोकेशन एक विद्यामंदीर असल्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता सुरेश पै यांनी याचा आदर राखत “नो स्मोकींग झोन” म्हणून डिक्लेर केला आहे.

No Smoking on the sets of Classmates

 
 
zagmag

नो स्मोकींग झोन...

चित्रपटाच शुटींग म्हंटल की धमाल मस्ती तर असतेच. पण शुटींग दरम्यान स्मोकींग किंवा कच-या मुळे तिथल वातावरण दुषित होत. यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता आज कल फार जागरूक झाले आहेत. याचा अनुभव काही दिवसापूर्वी क्लासमेट चित्रपटाच्या शुटींग दरम्यान आला. चित्रपटाच शुटींग सोफिया कॉलेज मध्ये चालल होत.

हे लोकेशन एक विद्यामंदीर असल्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य आणि निर्माता सुरेश पै यांनी याचा आदर राखत “नो स्मोकींग झोन” म्हणून डिक्लेर केला आहे. एवढच नाही तर वॉशरूम आणि व्हॅनीटी मध्ये पण नो स्मोकींग प्लिज असा बोर्ड लावण्यात आला आहे.

सोफिया कॉलेज हे एक बॉलीवूड चित्रपटासाठी आयडियल लोकेशन मानल जात. पहिल्यांदाचा मराठी चित्रपटासाठी हे लोकेशन वापरल जात आहे. सुरेश पै यांचा चित्रपट क्लासमेट साठी हे लोकेशन वापरल जात आहे. या कॉलेज मध्ये तब्बल १२ दिवस या चित्रपटाच शुटींग चालल. क्लासमेट च्या पूर्ण टिम ने आदित्य सरपोतदार, अंकुश चोधरी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सुशांत शेलार, सचित पाटील यांनी यशस्वीरित्या शुटींग पूर्ण केल.

------------------