Sign In New user? Start here.
olx adv marathi girl glued on fridge for 9 hrs लीकडेच टीव्हीवर एक जाहिरात लागते. Olx पे बेच दे ज्यामधे मिसेस शर्मा फ्रिजला चिकटलेली दिसते. ती मिसेस शर्मा म्हणजे तृप्ती खामकर ही मराठी मुलगी.
 
 
zagmag

Olx च्या जाहिरातशुटसाठी ९ तास फ्रिजला चिकटून बसली ही मराठी मुलगी.

अलीकडेच टीव्हीवर एक जाहिरात लागते. Olx पे बेच दे ज्यामधे मिसेस शर्मा फ्रिजला चिकटलेली दिसते. ती मिसेस शर्मा म्हणजे तृप्ती खामकर ही मराठी मुलगी. या दोन सेंकदाच्या जाहिरातीत ती तुम्हाला फ्रिजला चिकटलेली दिसते पण प्रत्यक्षात शुटींगच्या वेळी फ्रेम पाहण्यासाठी आणि शुटसाठी तिला ९ तास असं चिकटून बसाव लागलं. तुम्हांला जर वाटत असेल की ते अ‍ॅनिमेशन वैगेरे केलं असेल तर तस काहीही नाहीये ती खरी त्या फ्रिजवर चिकटली होती.

तृप्ती म्हणते नॉर्मली मी सेटवर खूप दंगामस्ती करते पण या सेटवर आम्ही नुसत काम केलं. फ्रेम अ‍ॅडजेसमेंट आणि शूट करताना काही तांत्रिक गोष्टीचा वापर करून मला त्या फ्रिजला चिकटवल किंवा बांधल म्हणता येईल. पण पुन्हा मेकअप करण्यासाठी किंवा दुस-या गोष्टींनासाठी जर मी उतरले असते तर ती बांधायची कसरत पुन्हा करावी लागली असती. म्हणून शूट फायनल होइपर्यंत मी त्याच अवस्थेत होते. कपील शर्माबरोबर काम करण्याच्या अनुभव खूपच चांगला होता. टीव्हीवर आपण त्याला दुस-याला हसवताना पाहतो कींवा आपल्याला वाटत की तो खूप गमती जमती करत असेल तर तस काही नाहीये.

तो खूप सिनसीयर आणि अबोल अ‍ॅक्टर आहे. पण क्विक अ‍ॅक्टर आहे. तो लगेच रिअ‍ॅक्ट होतो दुस-याला कशाप्रकारे रिप्लॉय करायच हे त्याला चांगल कळतं. मराठी मध्ये जसे सतीश तारे होते ते पटकन रिअ‍ॅक्ट करायचे तसाच आहे तो. पूर्णशूट मधे आम्ही फक्त हॅलो एवढंच बोललो असू. ही जाहिरात आम्ही मार्च मधे शूट केली होती ती अता टीव्हीवर दिसत आहे. तृप्तीने या आधी फू बाई फू च्या दोन सिझन मधे काम केलं आहे. त्याचबरोबर पिया बहरूपिया, झुलवा, अंधायुग सारख्या असंख्य नाटकामधून कामं केल आहे.

 

------------------