Sign In New user? Start here.
' पुण्यापासून दहा किलोमीटर अंतरावर बावधन येथे हिरव्यागार टेकडीवरील ऍम्ब्रोसिया रिसॉर्टसला आगामी मराठी चित्रपट पोस्टर बॉईजच्या कलाकारांनी शनिवारी सायंकाळी भेट देऊन चित्रपटाचे प्रमोशन करित प्रसारमाध्यमांशी आज संवाद साधला.
 
 
zagmag

पोस्टर बॉईज्‌च्या कलाकारांची टीम अवतरली पुण्यात

पुण्यापासून दहा किलोमीटर अंतरावर बावधन येथे हिरव्यागार टेकडीवरील ऍम्ब्रोसिया रिसॉर्टसला आगामी मराठी चित्रपट पोस्टर बॉईजच्या कलाकारांनी शनिवारी सायंकाळी भेट देऊन चित्रपटाचे प्रमोशन करित प्रसारमाध्यमांशी आज संवाद साधला.

पोस्टर बॉईज चित्रपटाचा निर्माता व अभिनेता श्रेयस तळपदे, चित्रपट निर्माती दीप्ती तळपदे, चित्रपटातील कलाकार ऋषिकेष जोशी, अनिकेत विश्‍वासराव, अभिनेत्री पूजा सावंत, नेहा जोशी, प्रख्यात संगीतकार लेस्ली लेव्हीस आदिंनी भेट दिली. यावेळी श्रेयस म्हणाला, शासकीय योजना असलेल्या नसबंदीच्या पोस्टरवर नजरचुकीने सर्वसामान्य नागरिकांचे फोटो प्रसिद्ध होतात व त्यातून निर्माण होणारा गोंधळ, विनोद यामध्ये पाहायला मिळणार आहे.

------------------