Sign In New user? Start here.
prarthana behares film shooting at Mauritius मितवा ,कॉफी आणि बरंच काही, तुझ्या विन मरजांवा असे एकापाठॊपाठ एक चित्रपट केल्यानंतर प्रार्थना बेहरे गायब झालीये
 
 
zagmag

प्रार्थना मॉरिशसमधे

मितवा ,कॉफी आणि बरंच काही, तुझ्या विन मरजांवा असे एकापाठॊपाठ एक चित्रपट केल्यानंतर प्रार्थना बेहरे गायब झालीये. गेल्या काही दिवसांपासून तिच्या बाबतीत कोणतीच बातमी सध्या मिडीयामधे नाहीये आणि महत्वाच म्हणजे प्रार्थना मुंबईमधे पण नाही. तर मग या मॅडम आहेत तरी कुठे तर या आहेत सध्या मॉरीशसमधे. तुम्हाला वाटत असेल की एवढे चित्रपट केल्यानंतर आराम करायला किंवा सुट्टी एन्जॉय करायला गेली असेलं. पण तस काही नाहीये वर्कोहोलीक प्रार्थाना सध्या तिच्या नविन चित्रपटाच्या शुटसाठी गेली आहे.

सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार याचित्रपटात तिच्या सोबत वैभव तत्ववादी पुन्हा एकदा दिसणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत मॉरीशस मधल शुट संपेल. काही दिवसांपूर्वी प्रार्थनाने शुट ऑन बीच हे टायटल देउन समुद्र किना-यावरचे फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर शेयर केले होते. तिने कॉफी आणि बरंच काही या चित्रपटात वैभव सोबत काम केलं आहे. त्यामुळे तिच्या या नविन चित्रपटात नेमक दोघांचा कॊणता रोल आहे हे समजू शकलं नाहीये.

या चित्रपटा बाबत निर्मात्यांकडून गुप्तता पाळली जातं आहे. त्यामुळे मॉरीशस मधे शुट केला जाणारा हा मराठी चित्रपट आणि त्यात प्रार्थना आणि वैभवची केमिस्ट्री पडद्यावर काय धमाल करते हे चित्रपट आल्यावरच कळेल.

 

------------------