Sign In New user? Start here.
priyadarshan & prajkta प्रियदर्शन व प्राजक्ताने हिंदी कलाकारांसोबत घातला धिंगाणा
 
 
zagmag

"प्रियदर्शन व प्राजक्ताने हिंदी कलाकारांसोबत घातला धिंगाणा"

priyadarshan & prajkta

प्रियदर्शन व प्राजक्ताने घातलेला धिंगाणा सध्या चांगलाच चर्चेत आलाय. या दोघांनी का व कोणता ‘धिंगाणा’ घातलाय? हे पहाण्यासाठी ‘ममता प्रोडक्शन बॅनर’ च्या आगामी ‘धिंगाणा’ या चित्रपटाची तुम्हाला वाट पहावी लागेल. या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटात अनेक हिंदी कलाकार अभिनय करत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतचं पूर्ण झालं असून पोस्ट प्रोडक्शनचे काम सध्या सुरु आहे.

समीर सदानंद पाटील निर्मित व चंद्रकांत दुधगावकर दिग्दर्शित ‘धिंगाणा’ हा निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे. प्रियदर्शन जाधव, प्राजक्ता हनमघर, अंशुमन विचारे, स्वप्नील राजशेखर यांच्यासोबत रझा मुराद, अवतार गिल, शहाबाज खान, कुनिका हे बॉलीवूडचे कलाकारही या चित्रपटात आहेत.

priyadarshan & prajkta

शशांक पोवार व अमित राज यांचं संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. हेमंत एदलाबादकर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. छायांकन आय गिरीधरन याचं असून कलादिग्दर्शन संदीप इनामके यांचं आहे. धमाल कथानक, कलाकारांची भन्नाट अदाकारी, ठेका धरायला लावणार संगीत असा करमणुकीचा सगळा मसाला असणारा ‘धिंगाणा’ प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करेल.

------------------------------------------.