Sign In New user? Start here.
 priyadarshan jadhav and priya bapat play lead role in timepass 2 प्रियदर्शन जाधव दगडू तर प्रिया बापट प्राजक्ता
 
 
zagmag

"प्रियदर्शन जाधव दगडू तर प्रिया बापट प्राजक्ता"

रवी जाधव दिग्दर्शित "टाईमपास" चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला. आता प्रतिक्षा आहे ती टाईमपास २ या चित्रपटाची. गेले काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंग साईटवर लोंकाची उत्सुकता वाढवण्यासाठी अंकुश चौधरी, संतोष जुवेकर, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर अशा नावांची चर्चा केली जात होती. (पण झी मराठी ने काही वेळा पूर्वी "यू ट्य़ूब" वर या चित्रपटाचा ट्रेलर टाकला आणि काही वेळातच तो प्रायव्हेट केला गेला.)

पण या ट्रेलर मुळॆ दगडूची भूमिका प्रियदर्शन जाधव आणि प्राजक्ताची भूमिका प्रिया बापट साकारणार आहे हे स्पष्ट झाले. प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांनी टाईमपास या चित्रपटाच्या भागात टीनएजर वयातल्या दगडू आणि प्राजक्ताची भूमिका साकारल्या होत्या. आता टाईपास २ मध्ये प्रियदर्शन आणि प्रिया ही जोडी पडद्यावर काय धमाल करते हे १ मे ला प्रेक्षकांच्या समोर येईलच.

 

------------------