Sign In New user? Start here.
fresh jodi fresh songप्रियांका चोप्राच्या व्हेंटिलेटर निमित्ताने राजेश म्हापुसकरांचे मराठीत पदार्पण
 
 
zagmag

प्रियांका चोप्राच्या व्हेंटिलेटर निमित्ताने राजेश म्हापुसकरांचे मराठीत पदार्पण

मुन्नाभाई एम. बी. बी. एस. , लगे रहो मुन्नाभाई , 3 इडियट्स आणि फरारी की सवारी या चारही हिट चित्रपटांमधला एक कॉमन फॅक्टर म्हणजे...राजेश म्हापुसकर! राजकुमार हिरानींसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिल्यानंतर ‘फरारी की सवारी’ या चित्रपटाच्या निमित्ताने, दिग्दर्शक राजेश म्हापुसकर यांनी दिग्दर्शनात पहिले पाऊल टाकले. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दिग्दर्शनाचे नाणे अचूक वाजवल्यानंतर दिग्दर्शक राजेश म्हापुसकर मराठी पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत. प्रियांका चोप्राच्या व्हेंटिलेटर या चित्रपटातून ते मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत.

फरारीची अनोखी सफर घडवणारे राजेश म्हापुसकर व्हेंटिलेटरच्या निमित्ताने एक धमाल, कौटुंबिक, विनोदी चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. त्यात प्रियांका चोप्राही या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटनिर्मिती क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकत आहे. तर राजेश म्हापुसकर आणि प्रियांका चोप्रा यांची ही पहिली-वहिली मराठी कलाकृती म्हटल्यावर कलाकारांबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असणारच...मात्र अद्याप कलाकारांची यादी गुलदस्त्यात आहे. ही यादी समोर आली नसली तरी सिनेसृष्टीतील मातब्बर मंडळी व्हेंटिलेटरच्या निमित्ताने एकाच पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असल्याचे, राजेश म्हापुसकर यांनी म्हटले आहे.दरम्यान पदार्पणासाठी या चित्रपटाच्या निवडीविषयी बोलताना, निर्मात्या मधु चोप्रा यांनी हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट असून हसता हसता प्रेक्षकांना मोलाचा संदेश ही देऊन जाईल, असे म्हटले आहे.

 

------------------