Sign In New user? Start here.
raghuvir yadav sing a song for marathi movie रघुवीर यादव यांच्या खास शैलीतल गांण बायोस्कोप या चित्रपटासाठी .
 
 
zagmag

रघुवीर यादव यांच्या खास शैलीतल गांण बायोस्कोप या चित्रपटासाठी

मराठी चित्रपटात अनेक नवीन नवीन प्रयोग होताना दिसत आहे आणि ते प्रयोग खूप वेगळे आणि महत्वाचे म्हणजे चांगले होत आहेत. बायोस्कोप या चित्रपटात ४ वेगवेगळ्या कथा हे या चित्रपटाच वेगळपण तर आहेच. पण यात आणखी नवीन प्रयोग केले गेले आहेत. कवी गुलजार यांनी या चित्रपटाची प्रस्तावना लिहली आहे असून त्याहून वेगळ म्हणजे हिंदी कलाकार रघुवीर यादव यांनी या चित्रपटासाठी खास हिंदीतून गीत गायलं आहे.

रघुवीर यादव या ज्येष्ठ कलाकाराला आपण नावाने फार कमी ऒळखत असलो तर त्याच्या ताकदीच्या अभिनयामुळे त्यांना सर्वजण ऒळखतात. त्यांनी लगान चित्रपटातही भूमिका केली होती त्याचबरोबर पीपली live' या सिनेमासाठी त्यांनी ' सखी सईया तो खूब ही कमात है, महगाई डायन खाये जात है' हे अत्यंत लोकप्रिय गाणे गायले होते. रघुवीर यादव हे उत्तम बासरी वादक व लोकसंगीताची आवड जोपासनारे जाणकार गायक आहेत . अलीकडेच त्यांनी पेप्सीच्या जाहिरातीसाठी ' ये दिल मांगे मोर ' ही जिंगल गायली आहे. बायोस्कोपचे चारही दिग्दर्शक ही खूश आहेत कारण अशा या महान कलाकाराने बायोस्कोप चित्रपटाचे शीर्षक गीत गायले आहे. या गाण्याचे गीतकार आहेत विजू माने आणि संगीतकार सचिन-जितेंद्र हे आहेत. मराठी चित्रपटात रघुवीर यादव यांनी गायलेलं हे हिंदी गीत पडद्यावर काय धमाल करतय हे लवकरच कळेल.

 

------------------