Sign In New user? Start here.
rajpal yadv now in marathi films‘दगडाबाईची चाळ’ या चित्रपटाच्या निमित्ताने राजपालने आता मराठीत एण्ट्री केली आहे. या एण्ट्रीविषयी बोलताना राजपाल म्हणतो की, मराठीत मला काम करायचे होते आणि या चित्रपटाद्वारे मला ही संधी मिळाली आहे.

rajpal yadv now in marathi films

 
 
zagmag

दगडाबाईची चाळ’ चित्रपटाद्वारे राजपाल यादवचे मराठीत पदार्पण

मराठी चित्रपट अलीकडच्या काळात यशाची शिखरे गाठत असताना हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांचे लक्षही वेधून घेत आहे आणि मराठी चित्रपटांत आपलाही सहभाग असावा, अशी इच्छाही हिंदीतल्या काही जणांना प्रकर्षाने होत आहे. याच मांदियाळीत आता हिंदी चित्रपटांतला विनोदाचा हुकमी एक्का समजला जाणारा अभिनेता राजपाल यादवची भर पडली आहे.

‘दगडाबाईची चाळ’ या चित्रपटाच्या निमित्ताने राजपालने आता मराठीत एण्ट्री केली आहे. या एण्ट्रीविषयी बोलताना राजपाल म्हणतो की, मराठीत मला काम करायचे होते आणि या चित्रपटाद्वारे मला ही संधी मिळाली आहे. आतापर्यंत मी हिंदीत केलेल्या भूमिकांपेक्षा या चित्रपटात माझी भूमिका वेगळी आहे. मला मराठी उत्तम रीत्या बोलता येते. गेले अनेक वर्ष मी मुंबईत राहतोय. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी मी महाराष्ट्रातील सातारा या भागात खूप वेळा मी गेलो आहे. त्या भागाची रांगडी मराठी मला खूप आवडते. बऱ्याच वेळा सेटवर जास्ती जास्त मराठीत बोलण्याचा मी प्रयेत्न करतो. महाराष्ट्राने मला खूप काही दिले आहे. मला मराठीत काम मिळाल्याने मी सध्या खूष आहे.

जय भोले प्रोडक्शन प्रस्तुत अन‌‍् दतात्रय हिंगणे निर्मित व सुनिल वाईकर दिग्दर्शित चित्रपट ‘दगडाबाईची चाळ’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या चित्रपटाचे कथानक एका चाळीत घडत असून कौटूबिंक व धमाल कॉमेडी चित्रपट बनिवण्याचा मानस दिग्दर्शक यांचा आहे. चित्रपटाची कथा – पटकथा सुनिल वाईकर, संवाद – अभिजित पेंढारकर, गीतकार – नचिकेत जोग, संगीत – अद्वैत पटवर्धन, गायक – आदर्श शिंदे, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, प्रतिभा थोरात, कला – अरुण राहणे, संकलन – एडविन एन्थनी, छायांकन – चारुदुखंडे, प्रोडक्शन – प्रदीप लडकत यांचे आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत राजपाल यादव, विशाखा सुभेदार, शिवानी सुर्वे, संग्राम साळवी, भूषण कडू, सुनील गोडबोले, मोहिनी कुलकर्णी असे अनेक दिगग्ज कलाकार आपणास पहावयाला मिळतील. चित्रपटाचे लवकरच चित्रीकरण सुरु होणार असून मुंबई, पुणे, अलिबाग येथे पार पडेल. या चित्रपटात एक आयटम सॉंग हिंदीतील आघाडीच्या अभिनेत्रीवर चित्रित करण्यात येणार आहे. अशी माहिती चित्रपटचे निर्माते आणि दिग्दर्शिक यांनी नुकत्याच झालेलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

------------------