Sign In New user? Start here.
ravi jadhvas eco friendly ganeshaअलिकडेच रवि जाधव यांनी सोशल नेटवर्किंग वर गणपती मुर्तीचे फोटॊ शेयर केला आहे. ज्यामध्ये ते आणि त्यांची पत्नी मेघना गणपतीची मुर्ती तयार करत आहेत.
 
 
zagmag

रवि जाधव यांचा इकोफ्रेंडली गणॆशबप्पा

ravi jadhvas eco friendly ganesha

गणपती बप्पा आता लवकरच येणार आहेत. त्याचे वेध आपल्याला लागलेच आहेत पण सेलिब्रेटीनां पण गणपती बप्पा घरी कधी येतील याचे वेध लागले आहेत. टाईमपास, नटरंग असे एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक रवि जाधव यांनी गणेश आगमनाची तयारी अत्ता पासून सुरू केली आहे. रवि जाधव हे स्वत: गणपती बप्पाची मुर्ती तयार करतात.अलिकडेच रवि जाधव यांनी सोशल नेटवर्किंग वर गणपती मुर्तीचे फोटॊ शेयर केला आहे. ज्यामध्ये ते आणि त्यांची पत्नी मेघना गणपतीची मुर्ती तयार करत आहेत. रवि जाधव हे दरवर्षी स्वत: मातीची गणेश मुर्ती तयार करतात. मागच्या वर्षी ही त्यांनी गणेशमुर्तीचे फोटॊ सोशल नेटवर्किंगवर शेयर केले होते. मुळात सेलिब्रेटी म्हंटल तर त्यांचे फॅन्स त्यांना फॉलो करतात. मग नेहमी त्यांची कपड्याची स्टाईल किंवा लूक्सला फॉलो करणारे चाहत्यांनी रवि जाधव यांचा स्वत: मातीची गणेशमुर्ती बनवण्याचा ट्रेंड फॉलो केलातर किती बदल होतील नाही का? रवि जाधव यांची गणेशमुर्ती अजून तरी पुर्ण नाही झाली. पण लवकरच या गणेशमुर्तीचे फोटॊ आम्ही तुमच्याबरोबर नक्की शेयर करू. रवी जाधव हे फक्त एवढ्या पुरती मर्यादीत न ठेवता होळी किंवा रंगपंचमी सारखे सण रवि जाधव असमान्य लहान मुलांन सोबत सेलिब्रेट करतात.

 

------------------