Sign In New user? Start here.
Rinku rajguru danceरिंकू राजगुरुच्या नृत्याची वेगळी झलक.
 
 
zagmag

रिंकू राजगुरुच्या नृत्याची वेगळी झलक

सैराट चित्रपटामधून आपल्या अभिनयाने केवळ महाराष्ट्रच नाही तर देश परदेशातील रसिकांची मने जिंकणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु पहिल्यांदाच एका वेगळ्या रुपात दिसणार आहे. झी मराठीच्या उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्यात रिंकुच्या नृत्याची वेगळी झलक येत्या रविवारी 28 ऑगस्टला सायंकाळी 7 वा. बघायला मिळणार आहे. यामध्ये रिंकूने ‘मी रात टाकली’, ‘चिंब पावसाने रान झालं आबादानी’ आणि ‘तू गं दुर्गा तू भवानी’ या गाण्यांवर नृत्याचा ठेका धरला.

div class="imgleftborder left">Rinku rajguru dance
Add Comment

सैराट चित्रपटानंतर सर्वत्र बोलबाला झाला आर्ची आणि परश्या या मुख्य जोडीचा. या जोडीने सर्वच प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. हिंदी असो की मराठी वाहिन्यांवरील रिअॅलिटी शो या सर्वच ठिकाणी या जोडीने लावलेली उपस्थिती प्रेक्षकांना मोहवून टाकणारी होती. या प्रत्येक ठिकाणी मात्र सैराटमधील गाणे किंवा त्यातील संवाद याच गोष्टी मुख्यत्वे बघायला मिळत होत्या. आता पहिल्यांदाच आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु एक आगळा वेगळा परफॉर्मन्स करताना बघायला मिळणार आहे. स्त्री शक्तीचा आणि तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करणा-या झी मराठीच्या ‘उंच माझा झोका पुरस्कार’ सोहळ्या रिंकूच्या नृत्याची ही अदा बघायला मिळणार आहे ज्यात ती ग्रामीण ढंगाच्या वेशभूषेत आणि दुर्गावतारात दिसणार आहे.

div class="imgleftborder left">Rinku rajguru dance
Add Comment

कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याची नुसती दखल न घेता त्यांच्या कार्याचा य़थोचित सन्मान करण्यासाठी झी मराठी वाहिनीने ‘उंच माझा झोका पुरस्कार’ या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरूवात केली. यंदा या पुरस्काराचं हे चौथं वर्ष आणि याही वर्षी समाजकारण, क्रीडा, पर्यावरण, आरोग्य, विज्ञान, अशा विविध क्षेत्रांत केवळ राज्यातच नव्हे तर देशात आणि जगात आपल्या कार्याचा ठसा उमटवणा-या कर्तृत्वशालिनींचा गौरव करण्यात आला. येत्या 28 ऑगस्टला सायंकाळी 7 वा. झी मराठीवरून हा पुरस्कार सोहळा प्रसारित होणार आहे.

div class="imgleftborder left">Rinku rajguru dance
Add Comment

 

------------------