Sign In New user? Start here.
rinku rajguru new movie mansu malligeमार्च महिना रिंकूसाठी महत्वाचा...
 
 
zagmag

मार्च महिना रिंकूसाठी महत्वाचा...

सैराट' म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती आर्ची अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरु. रिंकू सध्या दहावी परिक्षेच्या तयारित बिझी आहे. मार्च महिना तिच्यासाठी मह्त्वाचा आहे. एक तर परिक्षा आणि दुसर म्हणजे तिचा दुसरा चित्रपट याच महिन्यात रिलीज होतोय. त्यामुळे स्वत:च्या पहिल्या चित्रपटात धडाकेबाज एन्ट्री करणा-या रिंकूला तिच्या दुस-या चित्रपटात किती यश मिळतय हे लवकरच कळेल. 'सैराट' सिनेमा रिलीज झाला तेव्हा रिंकूने नववीची परीक्षा उत्तीर्ण करुन दहावीत प्रवेश मिळवला होता. प्रसिद्धीमुळेच शाळेत न जाता बाहेरुन दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय तिने घेतला.

रिंकू राजगुरु अकलूजच्या जिजामाता कन्या विद्यालयात शिकत होती. नववीत तिला 84 टक्के गुण मिळाले होते. येत्या 7 मार्चपासून रिंकूची दहावीची परीक्षा सुरु होत आहे .त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस 'सैराट'च्या कन्नड रिमेकमध्ये रिंकूने मुख्य भूमिका साकारली आहे. 7 मार्च ते 25 मार्च या काळात दहावीची परीक्षा आहे. ही परीक्षा संपली की 'सैराट'चा कन्नड रिमेक असलेला ‘मनसु मल्लिगे’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

------------------