Sign In New user? Start here.
"‘"होणार सुन मी ह्या घरची" मालिकेतील रोहन म्हणतोय "तो मी नव्हेच"
 
 
zagmag

"होणार सुन मी ह्या घरची" मालिकेतील रोहन म्हणतोय "तो मी नव्हेच"

rohan gujar saya to me navech

"होणार सुन मी ह्या घरची" मालिकेत जान्हवी च्या भावाचा रोल करणारा पिंट्या म्हणजेच ’रोहन गुजर’ म्हणतोय तो मी नव्हेच. नुकतीच झी मराठीवर खुलता कळी खुलेना हि नवीन मालिका सुरू झाली आहे.यामध्ये मुख्य भूमिका करणारा ओम प्रकाश शिंदे आणि रोहन मध्ये बरेच साधर्म्य आहे.

गैरसमज झाला की नवीन मालिकेमध्ये मुख्य भूमिका करणारी व्यक्ती म्हणजे रोहनच आहे. त्यामुळे रोहन ला अनेक शुभेच्छा देणारे चाहत्यांचे फोन आणि मॅसेजस येत आहे. त्यामुळे रोहन ने सोशल नेटवर्किंग साईट वर तो मी नव्हेच अशी पोस्ट टाकली असून त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. त्यात त्याने म्हंटले आहे की....

मला खूप फोन, मेसेजेस आले आणि येतायत...झी मराठी वरील नवीन मालिकेसाठी शुभेच्छा देणारे... पण मित्रांनो त्या मालिकेतला तो मी नव्हेच!!

तो आहे @Omprakash_shinde...omprakash तूला,Santoush Bharat Kanekar Sir ani खुलता कळी खुलेना मालिकेच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा...

आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार...लोकांना तुम्हाला काम करताना पाहावसं वाटतं हा विचारच सूखद आहे...आणि म्हणूनच लवकरच येत आहे तुमच्या भेटीला एका नवीन रूपात...अधिक माहिती साठी Stay tuned...Much love and success to you all !!!

------------------------------------------.