Sign In New user? Start here.
small-sachin-connedएका महिलेव्दारे अभिनेता सचिन पिळगावकर यांची ३५ लाखाची फसवणूक
 
 
zagmag

एका महिलेव्दारे अभिनेता सचिन पिळगावकर यांची ३५ लाखाची फसवणूक

Sachin Pilgaonkar conned by a Woman

मुंबई : पुण्याच्या एका महिलेने अभिनेता सचिन पिळगावकर यांना ३५ लाखांना गंडवलं. सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांना बिमडब्ल्यू कार घ्यायची होती. पुण्यातील एका महिलेच्या हे लक्षात आल्यावर तिने ३५ लाखात बिमडब्ल्यू कार घेऊन देऊ असे सांगितले. म्हणून पिळगावकर दांपत्यानी त्या महिलेस ३५ लाख रूपये दिले पण आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येता त्यानी खार पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे.

त्या महिलेला ३५ लाख देऊनही कार मिळाली नाही. त्याआधी पिळगावकरांनी त्या महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे सचिन-सुप्रिया यांनी तातडीने पोलिस स्थानकात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.मुंबई पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग याबाबत अधिक तपास करत आहे.

------------------