Sign In New user? Start here.
'Sachin Pilgaonkar new lookसचिन पिळगावकर या सदाबहार सुपरस्टार आपण गोड चेह-याचा कलाकार म्हणूनच गेली पाच दशके ऒळखतो. त्यांच्य चेह-यावर कधी कुणी दाढीची खुंदे पाहिली आहेत? नाही ना! अगदी त्यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकरांनीही आतापर्यंत पाहिली नव्हती.
 
 
zagmag

“सचिन पिळगावकर यांचा नविन लूक ने सुप्रिया आश्चर्यचकीत"

सचिन पिळगावकर या सदाबहार सुपरस्टार आपण गोड चेह-याचा कलाकार म्हणूनच गेली पाच दशके ऒळखतो. त्यांच्य चेह-यावर कधी कुणी दाढीची खुंदे पाहिली आहेत? नाही ना! अगदी त्यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकरांनीही आतापर्यंत पाहिली नव्हती. पण नुकताच त्यांना एक सुखद व आश्चर्यकारक धक्का अनुभवायला मिळाला.‘सांगतो ऎका’ या आपल्या आगामी चित्रपटासाठी सचिन यांनी वेगळे रूप धारण केले आहे. त्यात त्यांनी दाढी ठेवली आहे. अतापर्यंत दाढी ठेवल्याचा त्यांना अनुभव चांगला नव्हता. वैयक्तिक पातळीवर त्यांना तो काहीसा निराशाजनक ठरला होता. म्हणून सचिन यांनी आतापर्यंत चित्रपट प्रवासात कधी दाढी ठेवली नव्हती.

पण या चित्रपटासाठी दिग्दर्शकाच्या आग्रहखातर त्यांनी दाढीयुक्त रूप धारण केले आणि ते त्यांच्या आसपासच्या सर्वांना आवडलेही. त्यात सुप्रिया यांचाही अपवाद नव्हता. मी सचिनजींना याआधी केवळ छायाचित्रांमध्येच दाढीमध्ये पाहिले होते. जेव्हा ते त्यांच्या दुस-या चित्रपटाचे म्हणजे ‘सव्वाशेर’ चे दिग्दर्शन करत होते तेव्हा त्यांनी दाढी वाढवायची भीती वाटते कारण साधारण त्याचवेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे आमच्या २९ वर्षाच्या संसारात त्यांनी कधीच दाढी वाढविली नव्हती. त्यानंतर एके दिवशी मला त्यांनी सांगितले की ते सतीश राजवाडे यांचे चित्रपटासाठी दाढी ठेवणार आहेत कारण एक दिग्दर्शक म्हणून राजवाडेंनी सचिजींना एका विशिष्ट लूकसाठी दाढी वाढविणे गरजेचे आहे. असे सांगितले होते. तेव्हापासून सकाळी उठून दाढी करणे त्यांच्यासाठी बंद झाले.

दाढीचे खुंट वाढलेल्या अवस्थेत त्यांना पाहणे सुरवातीला कसेसेच वाटायचे. पण काही दिवसांतच दाढीच्या खुंटाचे एक छान झुपकेदार दाढीत रूंपांतर झाले. मी तर त्यांना सांगितलेही की, त्यांनी दाढी कायमस्वरूपी ठेवायला हवी. ते दाढीमध्ये खूपच स्मार्ट दिसत होते. पण त्यानंतर ती अधिकधीक वाढत गेली आणि नंतर त्यांना दाढीबरोबर खेळायची सवय लागली. ते एवढ्य वेळा आपली दाढी आरखात न्याहाळायला लागले की, मला एकदा वाटले की त्यांनी त्यांची दाढी काढून टाकावी. मी तर केव्हा एकदा चित्रीकरण संपते त्याचे दिवसच मोजत होते. एकदा का चित्रीकरण संपले की मी पुन्हा एकदा माझ्या नवरोबाचे गोबरे गाल ऒढायला मोकळी!," सुप्रिया यांची ही प्रतिक्रिया अगदी बोलकी होती.

------------------